अरे बापरे….मुलगी जन्माला आली म्हणून जावयाने पत्नीला पाठवले माहेरी
अमळनेर : मुलगी जन्माला घातली म्हणून मुलीला टाकून घालणाऱ्या धुळ्याच्या जावई व व्याही विरुद्ध सासूने विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.
रुबजी नगर मधील एक महिलेच्या मुलीचे लग्न धुळे येथील सागर आंनदा साटोटे याच्याशी झाला होता. दोन महिन्यांपूर्वी मुलीला मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळीने मुलीला अमळनेर येथे माहेरी पाठवले होते. २१ मार्च रोजी सागर साटोटे व त्याचे वडील आनंदा मकडू साटोटे हे दोन वर्षांचा नातू कार्तिक याला घ्यायला आले. तो त्याच्या आईशिवाय राहू शकणार नाही म्हणून सासूबाईने जावयाला विरोध केला. त्यावेळी व्याहीने लाथा बुक्क्यांनी मारहाण करून विनयभंग केला. तर जावई सागर याने मुलीला मारहाण करून तिच्या मंगळसूत्राचे नुकसान केले. थोड्या वेळात पती घरी परत आला असता अज्ञात चालक याने पतीलाही मारहाण केली. म्हणून महिलेने जावई ,व्याही आणि चालक विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला विनयभंग व मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल चंद्रकांत पाटील करीत आहेत.