धरणगाव प्रशासनाकडून निघालेल्या मतदान जनजागृती रॅलीत बालकवी ठोंबरे व कुडे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
धरणगाव ( प्रतिनिधी ) – दि.१३ मे २०२४ रोजी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी धरणगाव प्रशासनाच्या वतीने नुकतेच मतदार जनजागृती रॅली भव्य स्वरूपात काढण्यात आली. या रॅलीमध्ये बालकवी ठोंबरे प्राथमिक शाळा व सारजाई दामोदर कुडे माध्यमिक विद्यालयाच्या ७० विद्यार्थ्यांनी सायकलवरती भव्य स्वरूपात रॅलीमध्ये सहभाग नोंदवला.सोबत मतदार जनजागृती संदर्भातले फलक व घोषणा देऊन पूर्ण शहरभर मोठ्या स्वरूपात जनजागृती केली. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणूक अधिकारी मा. निवृत्ती गायकवाड तसेच तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी,पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले साहेब, नायब तहसीलदार सातपुते साहेब, नायब तहसीलदार देवराज साहेब त्याचप्रमाणे धरणगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी मा.भावना भोसले मॅडम त्याचप्रमाणे शाळेचे प्राथमिक विभाग मुख्याध्यापक जीवन पाटील सर , माध्यमिक विभाग मुख्याध्यापक एस एस पाटील सर ,बालक मंदिर च्या प्रमुख मीनाक्षी वारुळे मॅडम,तसेच तहसील कार्यालयाचे अधिकारी वर्ग, पंचायत समितीतील अधिकारी वर्ग, शहरातील प्रतिष्ठित नागरिक,शहरातील शाळेतील मुख्याध्यापक वर्ग व सर्व शिक्षक, शिक्षिका यांनी या विशेष जनजागृती उपक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या रॅलीसाठी सांस्कृतिक समितीचे प्रमुख कैलास माळी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .सोबत समितीतील सदस्य के.के चव्हाण ,पल्लवी मोरे, रजनीराणी पवार, पी.पी. रोकडे, सरोज तारे, नीता महाजन व शितल वानखेडे यांनी सहकार्य केले.