रेवा गुर्जर माहेर महीला मंडळ,जळगाव तर्फे चैत्र गौरीच्या हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन
एरंडोल ( प्रतिनिधी ) – दि.११ एप्रिल २०२४ रोजी रेवा गुर्जर माहेर महिला मंडळ, जळगाव तर्फे चैत्र गौरी निमित्त गौवराई ची स्थापना व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी नैवेद्याला ५६ भोग प्रसादाचा नैवेद्य दाखवण्यात आला.तसेच याप्रसंगी मंडळाच्या सर्व उपस्थित महिलांना हळदी कुंकू देऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुभा महाजन व मंडळाच्या अध्यक्षा सौ. शैला चौधरी, डॉ नुतन पाटील,संध्या पाटील, क्रांती पाटील, मनिषा चौधरी, कांचन महाजन,माधुरी महाजन,जयश्री चौधरी, स्वाती महाजन, भारती पाटील, प्रिती चौरी, शिल्पा पाटील, संगीता चौधरी , तेजल चौधरी , चैताली चौधरी, ममता चौधरी , वर्षा महाजन या सर्व कार्यक्रमाला उपस्थित होत्या.
आजपासून महिनाभर चालणाऱ्या या उत्सवात सर्व महिला उत्साहाने सहभागी झाल्या.हळदी कुंकू च्या निमित्ताने मंडळाच्या सर्व महिलांमध्ये सुसंवाद साधला गेला.रेवा गुर्जर माहेर महिला मंडळ, जळगाव हे सातत्याने महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते.परिसरातील सर्व महिला उत्साहाने प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात.