रेडक्रॉसच्या पुढाकाराने एरंडोल येथील आई हॉस्पिटल् येथे यशोदाई ब्लड स्टोरेज सेंटरचे उद्घाटन उत्साहात संपन्न
एरंडोल – जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून इंडियन रेडक्रॉस सोसायटी रक्तकेंद्र जळगाव च्या माध्यमातून एरंडोल येथील जुन्या धरणगाव रोडवरील आई हॉस्पिटल् येथे ” यशोदाई ब्लड स्टोरेज सेंटरचे” उद्घाटन उत्साहात संपन्न झाले. या उद्घाटन सोहळ्यासाठी एरंडोल ,धरणगाव कासोदा, पारोळा ,भडगाव या तालुक्यांमधील डॉक्टर्स, समाजसेवक, रक्तदान शिबिर आयोजक व मान्यवर उपस्थित होते.
या सोहळ्यासाठी उद्घाटक म्हणून एरंडोल तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा, पारोळा तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. महेश पवार, धरणगाव तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ मिलिंद डहाळे, डॉ.अरुण कुलकर्णी, एरंडोल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री.सतीश गोराडे, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष श्री. गनी मेमन, चेअरमन श्री. विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन चेअरमन श्री.सुभाष सांखला, सहप्रशासकीय अधिकारी डॉ. राजेश सुरळकर, सुखकर्ता फाउंडेशनचे डॉ. नरेंद्र ठाकूर उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून एरंडोल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ कैलास पाटील , माजी नगराध्यक्ष रवींद्र अण्णा महाजन ,डॉ मुकेश चोधरी , डॉ राहुल वाघ , डॉ अग्निहोत्री , डॉ पळशीकर ,डॉ ज्ञानेश्वर पाटील , डॉ राजेंद्र देसले ,, डॉ गीतांजली ठाकूर , डॉ गायत्री पाटील ,डॉ किशोर पाटील , डॉ अमोल बोरनारकर , डॉ राखी काबरा , डॉ अश्विनी पाटील ह्यांसह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांची उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना रेडक्रॉस रक्तकेंद्राचे चेअरमन डॉ.प्रसन्नकुमार रेदासनी यांनी रक्तकेंद्रातील अद्ययावत तंत्रज्ञानाबाबत माहिती देत नॅट तंत्रज्ञानाबाबत विस्तृत माहिती दिली.
एरंडोल तालुका डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुधीर काबरा यांनी एरंडोल तालुक्यात सुरू करण्यात आलेल्या या रुग्णसेवेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या. धरणगाव डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मिलिंद डहाळे यांनी अडचणीच्या प्रसंगी रक्ताअभावी येणाऱ्या अडचणी व या स्टोरेज सेंटरमुळे होणारा फायदा यावर शुभेच्छापर आपले मनोगत व्यक्त केले. लोकशाहीर सखाराम जोशी प्रतिष्ठानचे श्री. संग्राम जोशी व श्री संदीप जोशी यांनी रक्तदान जनजागृतीपर स्वरचित पोवाडा सादर केला. ब्रह्मकुमारी केंद्रीय विश्वविद्यालयाच्या पुष्पादीदी यांनी या रुग्णसेवेला शुभेच्छा व आशीर्वाद दिले
रेडक्रॉस उपाध्यक्ष श्री. गनी मेमन यांनी रेडक्रॉस मार्फत सुरू असलेल्या सर्व उपक्रमांबाबत माहिती देत भविष्यात रेडक्रॉस मार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व सेवाकार्याची माहिती दिली.
रक्तदान शिबीर आयोजनात उल्लेखनीय कार्य करत असल्याबद्दल
एरंडोल येथील विवेकानंद केंद्राचे पदाधिकारी श्री . गणेश महाजन सर , श्री . प्रसाद दंडवते ह्यांचा व ह्या ब्लड स्टोरेज केंद्रात फिजिशियन म्हणून सेवा देणाऱ्या डॉ सुयश पाटील व प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून सेवा देणाऱ्या श्री प्रमोद पाटील व भारत महाले ह्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .आई हॉस्पिटलचे संचालक डॉ. किरण पाटील यांनी रेडक्रॉसने या रुग्णसेवेची संधी दिल्याबद्दल रेडक्रॉसचे आभार व्यक्त करत यशोदाई ब्लड स्टोरेजच्या माध्यमातून 24 तास ही रुग्णसेवा सुरू राहणार असल्याचे आश्वासन दिले व उपस्थितांचे आभार मानले.
जागतिक आरोग्य दिनानिमित्ताने इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव कडून
एरंडोल तालुक्यातील सर्व हॉस्पिटल्स मधील पॅरामेडिकल स्टाफला हायजेनिक किट भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सौ. उज्वला वर्मा यांनी केले.
तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री महेश पाटील , श्री शेखर बुंदेले व आई हॉस्पिटल च्या कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले .