एरंडोल येथे क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न
प्रतिनिधी – एरंडोल येथे महात्मा फुले युवा क्रांती मंच व समस्त माळी समाजातर्फे क्रांतीज्योती महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शहरातील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला सकाळी ८.०० वा. शहरातील व परिसरातील मान्यवर तथा समस्त माळी समाज व फुले आंबेडकर विचारसरणीच्या मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी पुणे येथील क्रांतीज्योती शक्तीपीठ यांच्याकडून महात्मा फुले आदर्श समाज भूषण माजी तहसीलदार अरुण माळी व माजी जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन यांना माजी नगराध्यक्ष देविदास महाजन यांच्या हस्ते पगडी घालून सन्मानित करण्यात आले
यावेळी सावित्री शक्तीपीठ पुणे चे अध्यक्ष दशरथ कुळधरण एस. बी. महाजन, कृउबाचे माजी सभापती शालिग्रामभाऊ गायकवाड, ज्येष्ठ शिवसैनिक रमेश अण्णा महाजन, एरंडोल महाविद्यालयाचे अध्यक्ष अमित पाटील, दशरथ महाजन, विजय महाजन, राजू चौधरी, राजेंद्र शिंदे , राजेंद्र महाजन , ज्येष्ठ नगरसेवक डॉ. सुरेश पाटील, पी. जी. चौधरी सर, गजानन महाजन, सुदर्शन महाजन, छोटू भगत, विठ्ठल आंधळे, मयूर महाजन, निंबा बडगुजर, प्रकाश महाजन, डॉ. सुधीर काबरा, महात्मा फुले युवा क्रांती संस्थापक अध्यक्ष कैलास महाजन ,अनिल महाजन , राजधर महाजन , बंटी महाजन , मधूकर महाजन, महेंद्र महाजन , प्रशांत महाजन , कुणाल महाजन , शुभम महाजन , गोपाल महाजन यांचेसह क्रांतीज्योती मंडळ सदस्य उपस्थित होते. उपस्थितांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. तसेच जयंतीदिनाच्या पूर्वसंध्येला महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनपटावर आधारित ” सत्यशोधक ” चित्रपट दाखवण्यात आला. दि.११ एप्रिल रोजी सकाळी महात्मा फुले युवा मंच व समस्त माळी समाजातर्फे भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तसेच संध्याकाळी शहरातून क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याची शहरातून भव्य सवाद्य मिरवणूक काढून मिरवणुकीत सजीव देखावा उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. याप्रसंगी परिसर व शहरातील असंख्य समाज बांधव व मान्यवर उपस्थित होते.