एरंडोल विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर ईव्हीएम व्हीव्हीपॅट बाबत मॉक ड्रिल प्रशिक्षण संपन्न.
प्रतिनिधी – 16 एरंडोल विधानसभा मतदारसंघांतर्गत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 चे बाबत मतदान केंद्रावर निवडणूक कर्तव्यर्थ नियुक्त मतदान केंद्राध्यक्ष व प्रथम मतदान अधिकारी यांचे ईव्हीएम व्हीव्हीपॅट बाबत मॉक ड्रिल प्रशिक्षण हे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत इनडोअर हॉल डीडीएसपी कॉलेज एरंडोल येथे पार पडले.यावेळी 380 मतदान केंद्राध्यक्ष व 381 प्रथम मतदान अधिकारी यांचे कडून ईव्हीएम व्हीव्हीपॅट द्वारे प्रत्यक्ष मतदान करणे डाटा क्लियर करणे,मशीन सिलिंग करणे इत्यादी बाबी पूर्ण करून घेण्यात आल्या तसेच ईव्हीएम हाताळणी बाबत त्यांची लेखी व तोंडी परीक्षा देखील यावेळी घेण्यात आली.उक्त परीक्षा,दिनांक ७/४ /२०२४ रोजी दिलेली ऑनलाइन परीक्षा व दिनांक १२/ ४ / २४ रोजीच्या प्रशिक्षणात नियुक्ताधिकारी कर्मचाऱ्यांचे ईव्हीएम बाबतचे ज्ञान यानुसार ऑनलाइन परीक्षेत ज्या परिक्षणार्थी यांना 270 गुणांपैकी कमीत कमी 202 गुण मिळाले अशा परिक्षणार्थी यांना प्रशिक्षण स्थळी तसे प्रमाणपत्र देण्यात आले.
सदर प्रशिक्षणासाठी एकूण 20 टेबलवर प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी 380 मतदान केंद्राध्यक्ष व 381 प्रथम मतदान अधिकारी एकूण 761 अधिकारी /कर्मचारी यापैकी 348 मतदान केंद्राध्यक्ष व 359 प्रथम मतदान अधिकारी एकूण 707 इतके अधिकारी कर्मचारी उपस्थित होते, तर 32 मतदान केंद्राध्यक्ष व 22 प्रथम मतदान अधिकारी एकूण 54 अनुपस्थित होते. उपस्थित प्रशिक्षणार्थी यांना मनीष कुमार गायकवाड सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व सुचिता चव्हाण तहसीलदार एरंडोल यांनी प्रत्येक फेरीचे सुरुवातीला या प्रशिक्षणाची गरज काय आहे व त्याप्रमाणे तुम्ही ईव्हीएम व्हीव्हीपॅटचे सखोल ज्ञान घेणे कसे आवश्यक आहे याबाबत मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणा दरम्यान आयुष प्रसाद जिल्हाधिकारी जळगाव यांनी प्रशिक्षण स्थळी भेट देऊन प्रशिक्षणार्थी यांच्याशी प्रत्यक्ष टेबल वर जाऊन संवाद साधला व प्रशिक्षणार्थी यांच्या शंकांचे निरसन केले.