४ मे ५ मे व ७ मे रोजी गृह मतदार घेण्यासाठी १० पथकांची नियुक्ती.
सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांची पत्रकार परिषदेत माहिती
एरंडोल – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत जळगाव लोकसभा मतदार संघातील एरंडोल विधानसभा मतदारसंघात गृह मतदान घेण्यासाठी एकूण 10 पथके तयार करण्यात आली आहे पहिल्या टप्प्यात चार मे पाच मे 2024 रोजी पथके एरंडोल विधानसभा मतदारसंघातील अंथरुणाला खेळून असणारे असे एकूण 136 मतदाराच्या गृह भेटी घेऊन त्यांचे मतदान करण्यात येणार आहे राहिलेल्या मतदारांसाठी 7 मे 2024 रोजी दुसऱ्या टप्प्यात गृहपेटी घेऊन त्यांचे मतदान करून घेण्यात येणार आहे अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी तीन मे 24 रोजी तहसील दालनात संध्याकाळी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
सदर पथकांमध्ये दोन मतदान अधिकारी पोलीस कर्मचारी सूक्ष्म निरीक्षक व्हिडिओ ग्राफर यांचा समावेश राहणार आहे एरंडोल विधानसभा मतदारसंघात और अंथरुणाला खेळून असणारे असे एकूण मतदार 136 असून त्यात 111 मतदार 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व 25 दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे हे मतदान कक्षा पर्यंत जाऊ शकत नाही त्यांचे मतदान करणे गरजेचे असल्याने व ते मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये त्यासाठी 4 मे 2024 रोजी व 5 मे 2024 रोजी तसेच द्वितीय मतदान 7 मे 2024 रोजी जाणाऱ्या पथकाला आवश्यक त्या सूचना देण्यात येऊन करण्यात आले आहे.
सर्व गृह मतदानाची संपूर्ण व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेत उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड तहसीलदार सुचिता चव्हाण पारोळा तहसीलदार डॉक्टर उल्हास देवरे निवडणूक नायब तहसीलदार डी एस भालेराव नायक तहसीलदार दिलीप पाटील हे अधिकारी उपस्थित होते.