राजेश पाटील यांना पोलीस महासंचालक पदक प्रदान….
एरंडोल : एरंडोल पोलीस ठाण्यात तैनात असलेले कॉन्स्टेबल राजेश पंडित पाटील यांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल १ मे रोजी जळगाव येथे जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या हस्ते महासंचालक पदकाने गौरविण्यात आले.
राजेश पाटील यांचा पोलीस निरीक्षक सतीश गोराडे, सपोनि गणेश अहिरे, शरद बागल यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी अनिल पाटील, मिलिंद कुमावत, अकील मुजावर, पंकज पाटील, किरण पाटील, संदीप पाटील आदी उपस्थित होते. राजेश पाटील यांना पदक मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.