शेतकऱ्याने वाचवले कबुतराचे प्राण.
प्रतिनिधी – एरंडोल येथील शेतकरी रवी वाघ यांनी आपल्या शेतातील विहिरीवर काही अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या जाळ्यात अडकलेल्या कबुतराचे प्राण वाचवले असुन त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल येथील शेतकरी रवी वाघ हे नेहमी प्रमाणे आपल्या शेतात गेले असता त्यांना शेतातील विहिरीवर कोणीतरी अज्ञात व्यक्तीने जाळे टाकले असून या जाळ्यात कबुतर अडकले असल्याचे दिसले त्यांनी लागलीच पवन पवार व रोहीन मोहिते या सहकाऱ्यांच्या मदतीने विहिरीवर असलेले जाळे कापले व त्यात अडकलेल्या कबुतराला काढून त्याचे प्राण वाचवले.यावेळी रवी वाघ यांचे जाळे कापून हात चक्क कापले गेले.याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी तालुका वनविभागात देखील तक्रार केली असल्याचे सांगितले.दरम्यान काही अज्ञात लोक नेहमी शेतकऱ्यांच्या उपरोक्ष त्यांच्या विहिरीवर अशा प्रकारे जाळे लावुन पक्ष्यांना पकडत असल्याचे रवी वाघ यांनी सांगितले.तरी सदर बाबत कुठेतरी थांबली पाहिजे अशी मागणी रवी वाघ व शेतकऱ्यांनी केली आहे.रवी वाघ यांनी उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाण्याचे नविन टँकर घेतले असता त्यांनी सर्वात आधी गुरांसाठी असलेल्या हाळवर मोफत पाणी टाकले.याबाबत देखील त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.