एरंडोलचे राहुल मराठे यांचा गुणवंत कामगार पुरस्काराने गौरव
एरंडोल – महावितरणाच्या परिमंडल कार्यालयात 1
मे महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी महावितरणसाठी उत्कृष्ट ग्राहकसेवा देणार्या यंत्रचालक आणि तंत्रज्ञ संवर्गातील 63 उत्कृष्ट वीज कर्मचार्यांचा मुख्य अभियंता कैलास हुमणे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देवून गुणवंत कामगार म्हणून सत्कार करण्यात आला. यात एरंडोल येथील आनंदनगर मधील रहिवासी आणि महावितरण कर्मचारी राहुल उत्तम मराठे यांचा समावेश आहे. त्यांना उत्कृष्ट गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचेवर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. एरंडोलचे महावितरणचे उपकार्यक़ारी अभियंता प्रशांत महाजन यांच्या विशेष सहकार्याने राहुल मराठे यांना पुरस्कार मिळाल्याचे मराठे यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित समारंभास मुख्य अभियंता कैलास हुमणे यांचेसह अधिक्षक अभियंता अनिल महाजन, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे, लेखा विभागाचे गणेश लिथुरे आणि सर्व कार्यक़ारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पुरस्कार्थींमध्ये जळगांव, धुळे आणि नंदूरबार जिल्ह्यातील 63 कर्मचार्यांचा समावेश आहे.
राहुल मराठे यांना गुणवंत कामगार पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याने त्यांचे अभिनंदन गटसचिव राजेश पाटील, विलास जगताप, सुनिल वानखेडे, नाना पाटील, नाना साळूंखे, भिला मराठे, मिलींद सपकाळे, टी. एन. पाटील, तुकाराम पाटील, राहुल भोई, अरूण चौधरी, किरण मनुरे, अनिल पवार, सचिन मोरे, सुभाष ठाकूर, शिंदे सर, हर्षल पाटील, संतोष चौधरी, पत्रक़ार दिपक बाविस्कर यांनी अभिनंदन केले आहे.