काम करतांना फक्त विकासाचा विचार करतो – आमदार चिमणराव पाटील
एरंडोल – येथील विजयी संकल्प मेळाव्यात केले प्रतिपादन.
प्रतिनिधी – काम करत असताना मी कधीही भेदभाव न करता फक्त विकासाला महत्व दिले असल्याचे प्रतिपादन एरंडोल विधानसभेचे आमदार चिमणराव पाटील यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात एरंडोल येथे चौधरी मंगल कार्यालय येथे आयोजित एरंडोल तालुका शिवसेना ( शिंदे गट ) पदाधिकारी व शिवसैनिकांच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिताताई वाघ यांच्या प्रचारार्थ विजयी संकल्प मेळाव्यात केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार ए. टी.पाटील,जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील,युवासेनेचे जिल्हाप्रमुख प्रा.मनोज पाटील,उपजिल्हाप्रमुख राजेंद्र चौधरी,कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड, जि.प.माजी उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले,युवासेना तालुका प्रमुख कमलेश पाटील,शहर प्रमुख आनंदा चौधरी,माजी तालुका प्रमुख बबलू पाटील,विधानसभा क्षेत्र प्रमुख सुदाम राक्षे,भाजपा माजी तालुकाध्यक्ष एस.आर.पाटील हे उपस्थित होते.
या मेळाव्यात शिवसेनेचे युवासेनेच्या काही वक्त्यांनी मित्र पक्ष विधानसभेत देखील आपल्या अशीच साथ देईल का ? असा प्रश्न उपस्थित केला असता आमदार चिमणराव पाटील व जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आपल्याला पूर्ण साथ दिली असल्याचे सांगितले व आपली बाजू भक्कम असली तर आपल्याला कोणालाही घाबरायची गरज नसल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
मेळाव्याचे प्रास्ताविक तालुका प्रमुख रविंद्र जाधव यांनी केले तर सुत्रसंचलन माजी उपनगराध्यक्ष कृणाल महाजन यांनी केले.कार्यक्रमाला पंचायत समितीचे माजी सभापती बापू पाटील,गबाजी पाटील,अनिल महाजन,बापू पाटील,जिल्हा दूध संघाचे संचालक दगडू चौधरी, कासोदा सरपंच बंटी चौधरी,तालुका संघटक संभाजी पाटील,युवासेना शहर प्रमुख कृष्णा ओतरी,विठ्ठल आंधळे,बाजार समितीचे संचालक गजानन पाटील,किरण पाटील,देविदास चौधरी,दादाजी पाटील,बबलू चौधरी,शहर संघटक मयुर महाजन,उत्राण अ.ह.सरपंच आनंदा धनगर,मुकुंदा पाटील मालखेडे,व्यापारी आघाडी प्रमुख परेश बिर्ला,विभाग प्रमुख चेतन बडगुजर,नंदू मोहिते,धीरज पाटील,देशमुख राठोड यांचेसह विविध गावांतील आजी – माजी सरपंच,उपसरपंच,सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे आजी – माजी चेअरमन,व्हा.चेअरमन,संचालक,शिवसेना – युवासेना आजी – माजी पदाधिकारी,शिवसैनिक व पत्रकार उपस्थित होते.