एरंडोल भुमी अभिलेख कार्यालयातील अधिकार्यांना लोकसेवा आयोगाचा पहिला दणका.
एरंडोल प्रतिनिधी…..एरंडोल येथील तालुका भूमि अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक बी. सी अहिरे व मुख्यालय सहाय्यक योगेश एस. ठाकूर यांनी अर्जदार शिवाजी वना सोनवणे यांना मोजणी नकाशा नक्कल विहित मुदतीत न दिल्याने दोन्ही अधिकाऱ्यांना नाशिक आयुक्त राज्यसेवा हक्क चित्रा कुलकर्णी यांनी प्रत्येकी पाचशे रुपये दंड आकारून नक्कल देण्याचा आदेश पारित केला.
एरंडोल येथील रहिवाशी शिवाजी सोनवणे तालुका भूमि अभिलेख कार्यालयाकडे मोजणी नकाशा गट नंबर 1549 चा मागणी अर्ज केला असता नकाशा मुदतीत न मिळाल्याने उप अधीक्षक भुमिअभिलेख एरंडोल यांच्याकडे पहिले अपील केले अपिलाची सुनावणी घेण्यात आली नसल्यामुळे अर्जदार सोनवणे यांनी दुसरे अपील जिल्हाध्यक्ष भूमि अभिलेख जळगाव यांच्याकडे दाखल केले दुसऱ्या अपिलावर सुनावणी होऊन नकाशा पुरविण्याचा आदेश देण्यात आला. तरीही नकाशाची प्रत पुरवण्यात आली नाही.परंतु अर्जदार यांना तिसरे अपील राज्यसेवा सेवा हक्क आयुक्त नाशिक यांच्याकडे करण्यात आले त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन्ही अधिकाऱ्यांना प्रत्येकी पाचशे रुपये दंड व शास्ती घेण्याचा आदेश पारित करून नकाशाची प्रत पुरवण्यात यावी असा आदेश देण्यात आला.