एरंडोल येथे अज्ञात चोरट्याने महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरली.
प्रतिनिधी – एरंडोल बसस्थानकावर बस मध्ये चढत असताना महिलेच्या हातातील अज्ञात चोरट्याने सोन्याची बांगडी चोरल्याची घटना घडली असुन एरंडोल पोलीस स्टेशनला तशी नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की एरंडोल तालुक्यातील खडके खु .येथील संगिता झुंबरसिंग पाटील या जळगाव येथे कामानिमित्त गेल्या होत्या त्या जळगाव वरुन एरंडोल येथे आल्या व त्यानंतर खडके खू.येथे जाण्यासाठी एरंडोल भडगाव बस मध्ये चढल्या परंतु गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने सदर महिलेच्या उजव्या हातातील २० ग्रॅम वजनाच्या सुमारे ६४ हजार किमतीची सोन्याची बांगडी चोरली असल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यामुळे त्यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्या च्या विरोधात तक्रार दाखल केली असुन पुढील तपास पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी योगेश महाजन व संतोष चौधरी करीत आहेत.