एरंडोल येथे बुद्ध जयंती निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न.
प्रतिनिधी – एरंडोल येथे बुद्ध जयंती निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.यावेळी धम्मचक्र नगरी बहुउद्देशीय संस्था व समस्त बौद्ध समाज एरंडोल यांच्या वतीने श्रावस्ती पार्क येथे एक दिवशीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते तर केवडी पुरा येथे भीमनगर ब्लू बॉईज मित्र परिवारातर्फे भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते.
धम्मचक्र नगरी बहुउद्देशीय संस्था तसेच समस्त बौद्ध समाज एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने एरंडोल येथे दिनांक 23 मे रोजी बुद्ध जयंती निमित्ताने धम्मचक्र नगरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भरत शिरसाट सर यांच्या संकल्पनेतून एक दिवशीय श्रामणेर शिबिराचे आयोजन श्रावस्ती पार्क एरंडोल येथे करण्यात आले होते. सदर शिबिर प्रसंगी 47 उपासकांनी श्रामनेरची दीक्षा घेतली. सर्वप्रथम सकाळी आठ वाजता संपूर्ण एरंडोल शहरात बुद्ध जयंती निमित्ताने रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना माल्यार्पण करण्यात आले. ‘आज जगाला युद्ध नको, आज जगाला बुद्ध हवा’ या घोषणेने एरंडोल चे वातावरण बुद्धमय झाले होते. या रॅलीला जिल्हाभरातून प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. सदर प्रसंगी भदंत उपाली व भदंत नागसेन यांची विशेष उपस्थिती होती. भदंत उपाली व नागसेन यांनी उपस्थित श्रामणेरांना चिवर देऊन दीक्षा दिली. श्रामनेर शिबिरानंतर उपस्थित श्रामणेरांना प्रमाणपत्र देण्यात आले. सदर प्रसंगी रमाई धम्मशील महिला संघाची स्थापना करण्यात आली. कार्यक्रम प्रसंगी मोठ्या प्रमाणात उपासक उपासिका शहरातून व तालुकाभरातून उपस्थित होते. भदंत उपाली व भदंत नागसेन यांनी उपस्थितांना धम्मदेेना दिली.
सदर शिबिर प्रसंगी भरत शिरसाट,डॉ. संदीप कोतकर, प्रा.नरेंद्र गायकवाड,संगीता साळुंखे यांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.नरेंद्र गायकवाड यांनी केले. सदर प्रसंगी माजी मुख्याध्यापिका उषाकिरण खैरनार,भैयासाहेब सोनवणे, प्रवीण केदार, धनराज मोतीराय, चिंतामण जाधव, भगवान ब्रम्हे, सुनील खैरनार, बाबुराव भगत, प्रकाश तामस्वरे, अण्णाभाऊ सोनवणे, सुधाकर मोरे, प्रा. उमेश सूर्यवंशी, डाॅ.उमेश गवई, प्रा.विजय गाढे यांची विशेष उपस्थिती होती. साळवा, धरणगाव, उत्राण, निपाणे, विखरण व पंचक्रोशीतील अनेक गावांमधून उपासक उपस्थित होते तर संध्याकाळी शहरातील केवडी पुरा येथील भीमनगर ब्लू बॉईज मित्र परिवारातर्फे भव्य रॅली चे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक सतिष गोराडे,बाजार समितीचे माजी सभापती शालिग्राम गायकवाड,माजी नगरसेवक प्रा.मनोज पाटील,सामाजिक कार्यकर्ते प्रमोद महाजन,अमोल तांबोळी,ॲड.ईश्वर बिऱ्हाडे,प्रवीण केदार,बाबुराव भगत,प्रा.उमेश सुर्यवंशी आदी उपस्थित होते.सुरुवातीला प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गौतम बुद्ध,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,विर एकलव्य यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करण्यात आले.त्यानंतर सामुहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.रॅलीला पोलीस निरीक्षक सतिष गोराडे यांच्या हस्ते फीत कापून सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी रविंद्र बोरसे,नितीन बोरसे,प्रकाश शिंदे,अनिल बोडरे,दिनेश बोरसे,सागर बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली बुद्ध जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष नरेंद्र बोडरे,उपाध्यक्ष सचिन बोरसे, भिमराज बोरसे,खजिनदार मनोज बोरसे,सह खजिनदार सुभाष गायकवाड,सचिव संदिप बोडरे,सह सचिव प्रविण खैरनार,कार्याध्यक्ष मुकेश बोरसे,उमेश शिंदे,प्रशांत इंगळे,हितेश सोनवणे,अमोल शिंदे,समाधान शिरसाठ,आनंद गायकवाड,खंडू सरदार,विनोद बोरसे,आकाश इंगळे,तुषार सोनवणे,सागर सरदार,गणेश बोडरे,अभिषेक शिंदे,रविंद्र बोडरे, राहुल बोडरे,देवानंद निकम,भुषण बोरसे,जितेंद्र बोडरे,जितेंद्र ह्याडींगे,संतोष गायकवाड,अमोल बोरसे,अनिल बोरसे,कैलास बोडरे, जितु बोरसे, करण शिंदे,विनोद सरदार,आदित्य बोरसे,राज सरदार,सुमित बोरसे,अक्षय सरदार,मयुर अहिरे,राजेश बोरसे,सुमित शिंदे,रोहित गायकवाड,प्रवीण इंगळे,विशाल गायकवाड,विशाल बोरसे,अविनाश बोरसे यांनी परिश्रम घेतले.रॅली मध्ये असंख्य महिला,पुरुष,लहान मुले सहभागी झाले होते.सर्वांनी पांढरे पोशाख परिधान केले होते.संपूर्ण रॅली मध्ये बुद्ध वंदना सुमधुर आवाजात वाजत होती.