अर्थसंकल्पात अंजनी प्रकल्प व पद्मालय उपसा सिंचन योजना यासाठी भरघोस तरतूदीची मागणी.
डॉ संभाजीराजे पाटील यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवेदन.
प्रतिनिधी – एरंडोल “अंजनी मध्यम प्रकल्प” व “पद्मालय उपसा सिंचन योजना” हे दोन्ही प्रकल्प गिरणा धरणावर सिंचित आहेत. या प्रकल्पाद्वारे एरंडोल व धरणगाव तालुक्यातील १६४५५ हेकटर जमीन भिजणारी आहे परंतु गिरणेच्या पाण्यात झालेली घट बघता सिंचन क्षेत्रातील व नदीकाठच्या गावासाठी पेय जलसाठी आरक्षित झाल्याने कृषी सिंचनासाठीची पाण्याची उपलबध्दता हि नगण्य झाली असल्याने परिणामी दोन्ही तालुक्यात शेती उत्पनात मोठी घट बघावयास मिळत आहे.
अंजनी प्रकल्पाची प्रशाकीय मान्यता हि १९७७ सालची असून , पद्मालय प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता १९९९ सालची आहे. दोन्ही प्रकल्पांच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेचे प्रस्ताव हे १५ वर्ष रखडलेले होते. मधील काळात या प्रकल्पांच्या किमतीत देखील वाढ झाली असून या प्रकल्पांसाठी भरघोस तरदूत करणे अत्यावश्यक आहे.
या दोन्ही तालुक्यातील पाण्याची निकड बघता वरील प्रकल्पाना गती मिळावी त्यासाठी येत्या अर्थसंकल्पात भरघोस आर्थिक तरतूद करण्यात यावी त्याचबरोबर परिसरातील कृषी आणि पेज जल पाणीप्रश्न बिकट होत असून शेतकरी त्याचबरोबर परिसरातील नागरिक यांच्या समस्येवर त्वरित उपाययोजना करणे आवश्यक असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे डॉ. संभाजीराजे पाटील यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देवगिरी या निवासस्थानी भेट घेऊन विषयाची मांडणी करत या दोन्ही प्रकल्पाना भरघोस निधी देऊन कार्यान्वित करण्यासाठीची मागणी केली.
पालकमंत्री गुलाबराव पाटील, मंत्री अनिल पाटील यांनाही निवेदन तथा पाठपुरावासाठी विनंती
आधिवेशनासाठी राज्यभरातील आमदार सध्या मुंबईत दाखल आहे, वरील दोन्ही योजनांच्या पाठपुरावा अधिक जोरात व्हावा यासाठी मंत्री गुलाबरावजी पाटील तसेच मदत पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील यांची देखील भेट मुंबईतील निवासस्थानी डॉ संभाजीराजे पाटील यांच्याकडून घेण्यात आली.