हणमंतखेडेसिम येथील वि.का.सोसायटीच्या चेअरमन पदी अभिजीत पाटील तर व्हाईस चेअरमन पदी पुंडलीक पाटील यांची बिनविरोध निवड

IMG-20240713-WA0116

प्रतिनिधी – एरंडोल तालुक्यातील हणमंतखेडेसिम येथील वि.का.सोसायटीच्या चेअरमन पदी अभिजीत पाटील तर व्हाईस चेअरमन पदी पुंडलीक पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
प्रा. नाना आत्माराम पाटील यांनी चेअरमन व माणीक परशुराम पाथरवट यांनी व्हाईस चेअरमन पदाचा राजीनामा दिल्याने ह्या जागा रिक्त झाल्या होत्या. सदर निवड अमित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रकाश पुंडलीक पाटील याच्या अध्यक्षते खाली बिनविरोध करण्यात आली.यावेळी संजय दिगंबर पाटील , प्रदिप वामनराव पाटील , संचालक किशोर राजाराम पाटील प्रकाश पाटील , भागवत पाटील, रविंद्र पाटील, सुरेश कोळी , अर्जुन पाटील , नवनिर्वाचीत चेअरमन अभिजीत पाटील व व्हाईस चेअरमन पुंडलीक विठ्ठल पाटील यांचा सर्व संचालका तर्फे सत्कार करण्यात आला.
संस्थेचे सचिव नाना पाटील, भगवान पाटील यांनी सहकार्य केले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!