धरणगाव वाहतूक नियंत्रक व कर्मचाऱ्यांनी मिळवून दिले प्रवाशाचे दहा हजार रुपये व महत्वाचे कागद पत्र.
प्रतिनिधी – एरंडोल धरणगाव वाहतूक नियंत्रकांची कामगिरी गाडीत राहिलेले दहा हजार रुपयांचे पाकीट पॅन कार्ड,आधार कार्ड व महत्त्वाचे डॉक्युमेंट सहित योग्य तपास लावून प्रवाशास परत मिळवून दिले. त्याबद्दल प्रवासी तोहीत युसुफ खाटीक मुक्काम पोस्ट पिंपरी तालुका धरणगाव यांनी परत मिळवून दिल्याबद्दल त्यांचे व सदर गाडीच्या चालक वाहक चंद्रकांत पटेल व एस पी चव्हाण शिंदखेडा डेपो यांचे आभार मानले त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबद्दल सविस्तर माहिती अशी की प्रवासी तोहित खाटीक हे सकाळी साडेसहा वाजता गाडी नंबर 2086 जळगाव ते शिंदखेडा मध्ये पिंपरी ते धरणगाव या गाडीने प्रवास करीत होते.बसच्या मागील सीटवर उतरताना त्यांचे पाकीट गाडीमध्येच पडले होते.ते धरणगावला उतरल्यानंतर दोन तासा नंतर नऊ वाजता पाकीट गाडीत पडल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी धरणगाव वाहतूक नियंत्रक यांच्याकडे चौकशी केली त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेले एस .टी. खैरनार यांनी दोंडाईचा आगार,जळगाव आगार सिंदखेडा या ठिकाणी संपर्क करून सदर बस शिंदखेडा आगाराची असल्याचे लक्षात आले.त्यानंतर त्यांनी चालक वाहकांचे मोबाईल नंबर मिळून लागलीच संपर्क साधला सदर पाकीट हे एका महिलेला मिळाल्यामुळे व एक प्रवासी हे पाकीट माझे आहे.असे सांगत असल्यामुळे गाडीत वाद सुरू होता. त्यातच वाहतूक नियंत्रकांचा फोन गेल्यामुळे वाहकांनी सदर पाकीट महिलेकडून ताब्यात घेतले व प्रवासी तोहित खाटीक यांना धरणगाव वाहतूक नियंत्रकामार्फत दहा हजार रुपये रोख व त्यातील पॅन कार्ड,आधार कार्ड वगैरे महत्त्वाचे डॉक्युमेंट सर्व त्यांना परत केले.त्यामुळे त्यांनी रा.प.म.मंडळातील कर्मचारी अतिशय कर्तव्यदक्ष व प्रामाणिक असल्याचे त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.याप्रसंगी मी त्यांचा खूप खूप आभार व्यक्त करतो पाकिटातील दहा हजार रुपये व माझे डॉक्युमेंट माझ्याकरता खूपच महत्त्वाचे होते.महत्त्वाची फी भरण्याचे पैसे गेल्याने मी खूपच भयभीत झालो होतो.रा.प.म कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नाने व प्रामाणिकपणामुळे मला माझी रक्कम व पाकीट परत मिळाली.यामुळे त्यांनी महामंडळाची प्रतिमा उंचावली आहे.असे उद्गगार काढून त्यांनी पुन्हा कर्मचाऱ्यांचे आभार मानले व खास करून धरणगाव वाहतूक नियंत्रकांचे प्रयत्नांना सॅल्यूट केले व चालक वाहक यांना प्रत्येकी पाचशे रुपये बक्षीस देऊन त्यांचा गौरव देखील केला व ही बाब माझ्या सदैव लक्षात राहील असे देखील त्यांनी म्हटले.