गुरुपौर्णिमानिमित्त येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिर परिसरातील विश्वातील एकमेव कमंडलूस्थित श्री अनघामाता व दत्त भगवान मंदिरात लघु रुद्राभिषेक
अमळनेर : आषाढ शुद्ध पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमानिमित्त येथील ख्यातनाम मंगळग्रह मंदिर परिसरातील विश्वातील एकमेव कमंडलूस्थित श्री अनघामाता व दत्त भगवान मंदिरात लघु रुद्राभिषेक करण्यात आला.पू. साने गुरुजी ग्रंथालय व वाचनालयाचे सचिव प्रकाश वाघ हे सपत्नीक पूजेचे मानकरी होते.
आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे. या दिनाचे औचित्य साधून येथील दत्त भगवान मंदिरात प्रकाश वाघ यांनी सपत्नीक श्री अनघा माता आणि श्री दत्त मूर्तीवर तसेच श्री मंगळेश्वर स्वामी समर्थांच्या पादुकांवर विधिवत लघु रुद्राभिषेक पूजा केली. मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक, तुषार दीक्षित, जयेंद्र वैद्य, गणेश जोशी, वैभव लोकाक्षी, मयूर राव, सुनील मांडे, ऋषिकेश कुलकर्णी, आयुष पिंपळे यांनी पौरोहित्य केले. यावेळी असंख्य भाविकांनी अनघा माता आणि श्री दत्त भगवानांचे दर्शन घेतले. यावेळी मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सह सचिव दिलीप बहिरम, खजिनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त डी. ए. सोनवणे, प्रकाश मेखा आदी उपस्थित होते.