एरंडोल येथे संमोहित करून मानव तस्करीची घटना
प्रतिनिधी – येथील रा. ति. काबरे विद्यालयात शिकणारी इयत्ता दहावीची विद्यार्थिनीला संमोहित करून मानव तस्करीची अतिशय भयंकर घटना घडलेली आहे . त्या विद्यार्थिनीला संमोहीत करून बसने चाळीसगावला नेले होते चाळीसगाव बस स्थानकावर एका शिक्षकाच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या सतर्कतेमुळे ती स्वगृही परत आलेली आहे. परंतु या घटनेवरून सर्व पालकांना विद्यालया तर्फे गांभीर्याने सुचित केले आहे की शाळा सुटण्याआधी दहा मिनिटे अगोदर शाळेच्या प्रांगणात येऊन आपल्या पाल्यांना घ्यायला यावे. आपण आपल्या पाल्यांना घेण्यासाठी उशीर करू नये विद्यार्थी प्रांगणात इकडे तिकडे फिरत असतात शाळा सुटलेली असली तरीही पालक मुलांना घ्यायला येत नाही तसेच काही विद्यार्थी शिक्षकांना न विचारता मधल्या सुट्टीत घरी परत येऊन जातात तरीही अशा विद्यार्थ्यांना पालकांनी तंबी द्यायची आहे तसेच मधल्या सुट्टीत शाळेचा आवाराबाहेर कोणत्याही विद्यार्थ्यांनी बाहेर जाऊ नये याची सुद्धा ताकीद त्यांना देणे गरजेचे आहे घरून येताना मुलांना कोणीही पैसे देऊ नये आपण दिलेल्या पैशामुळे ते खाऊ घेण्यासाठी शाळेचा आवार सोडून बाहेर जातात व अघटीत घटना घडू शकतात त्यामुळे आपण याची काळजी घ्यायची आहे.