शंकर नगर वासियांचे नगर पालिकेला निवेदन.
प्रतिनिधी – एरंडोल येथील शंकर नगर परिसरातील रहिवाशांनी एरंडोल नगर पालिकेला नगरातील रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाकण्यासाठी निवेदन दिले.सदर निवेदन नगरपालिकेचे ओ.एस.विनोद कुमार पाटील यांना भेटून निवेदन दिले.
निवेदनात शहरात सध्या नगर पालिकेतर्फे नूतन पाईप लाईन चे काम सुरु असल्याने सर्वत्र खोदकाम काम झाले असल्याने रस्ते पूर्णतः खराब झाले आहे व त्यामुळे खड्डे तयार होऊन त्यात पाणी साचत आहे त्यामुळे सर्वत्र चिखल होत असल्याचे म्हटले असुन रहिवाशांना पायी चालणे देखील मुश्किल झाले असल्याचे म्हटले आहे त्यासाठी सदर रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात मुरुम किंवा कच टाकल्यास रहिवाशांना चालण्या साठी तयार करून द्यावा असे म्हटले आहे.तसेच नगर पालिकेस वारंवार संपर्क करून देखील कुठल्याही स्वरूपाचा प्रतिसाद देण्यात येत नसल्याचे म्हटले असुन सदर बाब गंभीर स्वरूपाची असल्याचे म्हटले असुन शंकर नगर मधील रस्त्यांवर जर मुरुम किंवा कच न टाकल्यास दोन दिवसांनी नगर पलिकेसमोर शंकर नगरातील संपूर्ण रहिवाशी उपोषणाला बसतील असे म्हटले आहे.
निवेदनावर ऍड.ईश्वर बिऱ्हाडे,अधिकराव पाटील,सुवर्णसिंग जोहरी,राजेंद्र पवार,सुभाष नेटके,राजेंद्र सोनार,धोंडू वाणी,विजेंद्र मराठे,गणेश वाकचौरे,मनोज पाटील,ज्ञानेश्वर ताडे, दिपक पाटील आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.