महेश पांडे यांच्या आदर्श सरपंच रत्न पुरस्कार देऊन
एरंडोल( प्रतिनिधी)- कासोदा येथील माजी सरपंच महेश ओंकार पांडे यांना मौलाना आझाद विचार मंच तर्फे आदर्श सरपंच रत्न पुरस्कार जळगावचे माजी उप महापौर डॉ,अब्दुल करीम सालार यांच्या हस्ते देऊन त्यांच्या गौरव करण्यात आला
त्यांनी गावासाठी केलेल्या समाजाभिमुख कामे, हिंदू मुस्लिम एकतेसाठी केलेले प्रयत्न या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यांची सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे
याप्रसंगी समाजसेवक भगवान महाजन धरणगाव चे माजी नगराध्यक्ष पी ,एम पाटील माजी जि ,प ,सदस्या सौ महानंदाताई दिनकर पाटील सौ सरिता सुभाष मंत्री भुसावळ चे ज्येष्ठ पत्रकार सल्लाउद्दीन अदीब डॉ ,नुरुद्दीन मुल्लाजी भास्कर चौधरी सरपंच पुरुषोत्तम भास्कर चौधरी उपसरपंच अरशदअली उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरिफ पेंटर ,सलाउद्दीन अलाउद्दीन शेख, जुल्फिकार अली, सलाम भाई यांनी परिश्रम घेतले