मौलाना आझाद विचार मंच तर्फे गुणवंत विद्यार्थी ,पत्रकार व उर्दू शायर सन्मानित
एरंडोल (प्रतिनिधी)- कासोदा येथील मौलाना आझाद विचार मंच तर्फे इयत्ता दहावी व बारावी च्या उर्दू ,मराठी, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना तसेच गावातील व जिल्ह्यातील पत्रकारांना व उर्दू शायर यांना समाजसेवक भगवान महाजन , डॉ ,अब्दुल करीम सालार, मराठा सेवा महासंघ चे जिल्हाध्यक्ष तथा धरणगाव चे माजी नगराध्यक्ष पी, एम ,पाटील सर माजी जि, प सदस्या सौ महानंदाताई दिनकर पाटील भुसावळचे सलाउद्दीन अदीब यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जळगावचे माजी महापौर डॉ , अब्दुल करीम सालार होते.
माजी सरपंच महेश ओंकार पांडे यांना संस्थेकडून आदर्श सरपंच रतन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सरपंच पुरुषोत्तम उर्फ बंटी भास्कर चौधरी उपसरपंच अरशद अली मुखतार अली यांच्याही सत्कार करण्यात आला तसेच स्वस्त धान्य दुकानदाराचे एरंडोल तालुका अध्यक्षपदी पुनेश सुभाष मंत्री यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्याही सत्कार करून सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य बापू सोनवणे माजी ग्रामपंचायत सदस्य भास्कर बाबुलाल चौधरी, सौ ,सरिता सुभाष मंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यांचेसह गावातील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते