अण्णाभाऊ साठेंचे कार्य समाजाला प्रेरणा देणारे…
पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांचे प्रतिपादन
एरंडोल, भवानीनगर परिसरात नुकतीच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल तर प्रमुख अतिथी पदी माजी उपनगराध्यक्ष प्रा. मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रवीण महाजन, माजी नगरसेवक बबलू पैलवान, पोलीस राजेश पाटील, अनिल पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी आमदार चिमणराव पाटील यांच्या संकल्पनेतून व निधीतून बांधण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे उद्घाटन प्रा. मनोज पाटील यांचे हस्ते करण्यात आले. लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महात्मा फुले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेची ही मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांनी आपल्या मनोगतातून सांगितले की, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचे जीवन कार्य समाजाला प्रेरणा देणारे असून अशिक्षित असतानाही त्यांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली. त्यांनी सामाजिक चळवळीमध्ये ही भाग घेत लोक जागृतीचे मोठे कार्य केले आहे. त्यांचा आदर्श घेऊन समाजाने पुढे जावे असे सांगत त्यांनी भवानी नगर मित्र मंडळाचे व मातंग समाज बांधवांचे मनस्वी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रवीण महाजन यांनी केले तर आभार एकनाथ सपकाळ यांनी मानले. या कार्यक्रमास मातंग समाज बांधव महिला वर्ग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दलित मित्र पुरस्कार प्राप्त स्व. अर्जुन गणपत सपकाळे यांच्या कार्याची ही समाजाला ओळख करून देण्यात आली. भीमा सपकाळे, नाना निकम, राहुल निकम, रमेश निकम आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रम यशस्वीतेसाठी एकनाथ सपकाळे, किशोर वैराळे, गणेश सपकाळे, गुलाब सपकाळे, दिलीप सपकाळे, कवी भिमराव सोनवणे, तुकाराम फुलारी आदींनी परिश्रम घेतले.