एरंडोल महाविद्यालयात भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांची जयंती साजरी.
प्रतिनिधी – एरंडोल येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील महाविद्यालयात
दिनांक ०९ /०८/२०२४ शुक्रवार रोजी डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांची जयंती व ग्रंथपाल दिवस साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.जे.पाटील अध्यक्षस्थानी होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ.अरविंद बडगुजर, माजी प्रभारी प्राचार्य प्रा.एन.ए.पाटील हे होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत डॉ.एस आर रंगनाथन यांच्या जीवनकार्याची ओळख व ग्रंथालय क्षेत्रात केलेल्या कार्याची माहिती महाविद्यालयाच्या ग्रंथपाल डॉ.शर्मिला व्ही.गाडगे यांनी उपस्थितांना करून दिली.
या कार्यक्रमांतर्गत १२ ऑगस्ट २०२४ ते १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत महाविद्यालयात तीन दिवसीय संदर्भ ग्रंथांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी ग्रंथपाल डॉ.शर्मिला गाडगे व सहाय्यक ग्रंथपाल नितीन पाटील यांनी संदर्भ ग्रंथांचे महत्त्व,संदर्भ ग्रंथ वापरण्या बाबतची माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच सदर ग्रंथ प्रदर्शनाला प्रांताधिकारी मनिषकुमार गायकवाड,व नायब तहसिलदार देवेंद्र भालेराव यांनी भेट दिली.सदर उपक्रमांना संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील,प्रा.डॉ.ए.जे.पाटील, उपप्राचार्य अरविंद बडगुजर यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रम यशस्वितेसाठी दिनेश पवार विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.
प्रसंगी महाविद्यालयातील सहाय्यक ग्रंथपाल नितीन पाटील दिनेश पवार तसेच महाविद्यालयातील प्रा. ए.टी. चिमकर प्रा.के.जे.वाघ प्रा.डॉ. एन.एस.तायडे प्रा डॉ.आर एस वानखेडे प्रा.डॉ.सचिन पाटील,प्रा.डॉ.नितीन दांडेकर प्रा.डॉ.हेमंत पाटील प्रा.डॉ.रेखा।साळुंखे प्रा.मनीषा बाविस्कर आदी उपस्थित होते .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहाय्यक ग्रंथपाल श्री.नितीन पाटील यांनी केले.