दिव्यांग व्यक्तींकरीता स्वयंचलित तिनचाकी सायकल व इतर आवश्यक सहाय्यक साहित्य वाटपासाठी मोफत तपासणी शिबीर
प्रतिनिधी – जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया भारत सरकारच्या उपक्रम सी एस आर योजने अंतर्गत भारतीय अंग निर्माण निगम (ALIMCO) मुंबई व लक्ष्य फाऊंडेशन , एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र यांच्या सहकार्याने एरंडोल व पारोळा तालुक्यातील दिव्यांगांसाठी मोफत आवश्यक सहाय्यक साहित्य वाटप पूर्व तपासणी शिबीराचे आयोजन रविवार, दिनांक २५ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायं. ४ वा. पर्यंत या वेळेत महात्मा फुले पुतळ्याजवळ एरंडोल येथे करण्यात आलेले आहे एरंडोल येथील नाव नोंदणीसाठी 8983941382 या क्रमांकावर संपर्क साधावा.
तसेच पारोळा शहरातदेखिल सोमवार दिनांक २६ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते सायं. ४ वा. पर्यंत पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती, कोर्ट जवळ, पारोळा येथे आयोजित करण्यात आलेले आहे. पारोळा येथे सहभागी होण्यासाठी 8806769898 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन लक्ष्य फाऊंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री.रोशन मराठे यांच्या वतीने करण्यात आलेले आहे.
आपल्या भागातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी या शिबिराचा लाभ घ्यावा. शिबिरामध्ये येतांना १) युडीआयडी कार्ड २)आधार कार्ड ३) 2 पासपोर्ट फोटो ४) रेशन कार्ड कींवा उत्पन्नाचा दाखला (मासिक उत्पन्न रु. २२,५००/- पर्यंत) ५) अपंगत्वाचे प्रमाणपत्र ही कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहेत.
सदर शिबिरात पुढील सर्व नियम व अटी लागू असणार आहेत,याची लाभार्थ्यांनी नोंद घ्यावी.
1) बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकलसाठी दिव्यांगत्वाचे कमीतकमी 80% प्रमाण असलेले दिव्यांग प्रमाणपत्र (युडीआयडी) आवश्यक आहे.
2) कोणत्याही सबबीवर 80% पेक्षा कमी दिव्यांग प्रमाणपत्र धारकांनी बॅटरीवर चालणारी तिनचाकी सायकलसाठी आग्रह करु नये.
3) इतर सहाय्यक साहित्यासाठी कमीत कमी 40% दिव्यांगांचे प्रमाण असलेले युडीआयडी ग्राह्य धरण्यात येईल.
4) तसेच 80% व त्यावरील दिव्यांगत्व असलेल्या बौध्दीक अक्षमता, सेरेब्रल पाल्सी, पार्कीसन्स, कर्णबधीर, मुकबधीर, अंध व्यक्तींना तसेच 18 वर्षाखालील मुलांना देखील बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल देता येणार नाही.
5) मागील 2 वर्षापासून बॅटरीवर चालणारी तीन चाकी सायकल किंवा इतर दिव्यांग साहित्याचा लाभ ज्या लाभार्थ्यांनी घेतला असेल अशा लाभार्थीना पुन्हा लाभ देता येणार नाही.
6) तसेच मागील व ह्या वर्षी तालुकास्तरावर ज्या लाभार्थ्यांना साहित्य वाटप झाले असेल त्यांना देखिल पुन्हा लाभ देता येणार नाही.
असे आवाहन लक्ष्य फाऊंडेशन,महाराष्ट्र चेसंस्थापक अध्यक्ष रोशन भगवान मराठे यांनी केले आहे.