उत्राण हायस्कूलचे उपशिक्षक भरत शिरसाठ यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार घोषित….  

IMG-20240905-WA0040.jpg

                            

प्रतिनिधी एरंडोल:- तालुक्यातील उत्राण येथील जाजू हायस्कूल मधील उपशिक्षक भरत आत्माराम शिरसाठ यांना साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुउद्देशीय सेवा समिती महाराष्ट्र राज्य या संस्थेतर्फे या वर्षाचा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. त्यांच्या निवडीचे पत्र शिरसायठ यांना प्राप्त झाले आहे. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल शिरसाठ यांची सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.                   .                         शिरसाठ यांची २५ वर्ष सेवा झाली असून ते इंग्रजी व शिक्षण शास्त्र या दोन विषयांमध्ये सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत साहित्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनीभरीव योगदान दिले आहे . समता शिक्षक परिषदेचे माध्यमिक विभागाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून ते धुरा सांभाळत आहेत पुरस्कारासाठी त्यांच्या निवडीबद्दल त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!