एरंडोल येथे पत्त्याच्या क्लब वर छापा मारून आठ लोकांविरुद्ध कारवाई.क्लब मालकाचा पोलीस हप्ते घेत असल्याचा आरोप…..
प्रतिनिधी – एरंडोल येथील धुळे रस्त्यावरील हॉटेल मयुरीच्या मागील बाजूस अवैद्य पत्त्यांच्या क्लब चालू असल्याचा सुगावा पोलिसांना लागल्याने नाशिक परिक्षेत्र येथील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छापा मारून क्लब मालकासह आठ जणांवर कारवाई करून पैसे, चार मोबाईल पत्ते खेळण्याचे साहित्य हस्तगत केले.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक यांना गुप्त बातमी द्वारे माहिती मिळाली जळगाव जिल्ह्यातील पोलीस एरंडोल शहरातील मयुरी हॉटेलच्या पाठीमागे बंदिस्त खोली ताडपत्रीच्या शेडमध्ये काही इसम व बबलू चैत्राम चौधरी उर्फ बबलू पैलवान हे त्यांच्या हस्तकाकरवी झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळ खेळत असल्याचे कळले त्यानुसार त्यांनी सदर इसमावर कार्यालयातील आवश्यक तो स्टाफ घेऊन कारवाईसाठी आपल्या पथकासह नाशिक येथून ८ सप्टेंबर २०२४ रोजी अडीच वाजेच्या सुमारास सरकारी व खाजगी वाहनाने पारोळा पोलीस स्टेशन येथे आल्यावर त्यांनी पोलीस उपनिरीक्षक भिसे यांना छापा कारवाईची मदत कामी सोबत घेतले यात त्यांच्या कर्मचारी पोलीस निरीक्षक सुनील पवार पो.ह. हिरालाल पाटील , पो.शि. अभिजीत पाटील , अनिल राठोड , आकाश माळी हे सर्व एरंडोल येथे उपस्थित झाले तसे च त्यांनी दोन पंचांना बोलवून त्यांच्या समक्ष छापा टाकण्याचे नियोजन केले व वरील ठिकाणी संध्याकाळी ७.०० वा.छापा टाकण्यात आला या ठिकाणी अनेक इसम झन्ना मन्ना खेळ खेळत असल्याचे आढळून आले त्यातील काही इसम पळून जात असताना त्यांचा पोलीस पथकातील पो. ह. विक्रांत मांगले पो. शि. स्वप्निल माळी यांनी पाठलाग केला परंतु ते पसार झाले त्यानंतर या ठिकाणी बबलू चौधरी (४०) रा. भोई गल्ली , विकास महाजन (३२) रा. माळीवाडा , गणेश चौधरी (५५ ), धनराज पाटील (४०) संदीप जाधव (३९) सतीश चौधरी (३२) हे सर्व राहणार एरंडोल तसेच चंद्रकांत वाघ (३९) राहणार कळमडू तालुका चाळीसगाव , दीपक लोहिरे (४७) राहणार गांधलीपुरा अमळनेर यांना अटक करण्यात आली असता यातील आठही इसमांनी आरडा ओरड करून तुम्ही येथे रेड कशी केली तुम्हाला माहित आहे का आम्ही कोण आहोत आम्ही तुमच्यावर पैसे घेतल्याचे खोटे आरोप लावू असे बोलून त्यातील काही इसम हे व्हिडिओ शूटिंग करत असल्याचे म्हटले आहे दरम्यान या ठिकाणी परिसरातील काही लोक सदर इसमांची समज घालत होते. तरी काही इसम या ठिकाणी हुज्जत घालत होते त्यामुळे गर्दी वाढू लागली त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक पवार यांनी एरंडोल पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांना बोलावून त्यांचे कर्मचारी सहाय्यक पो. नि. शंकर पवार पोलीस उपनिरीक्षक शरद बागल ग्रेड पो. उ.नि विकास देशमुख पो.ह. विलास पाटील , काशिनाथ पाटील संतोष चौधरी पो. ना. दीपक पाटील पो. शि. दीपक अहिरे पंकज पाटील यांनी घटनास्थळी येऊन उपस्थितांचे समजूत काढून प्रकरण शांत केले दरम्यान या ठिकाणी १ लाख ३१ हजार १४० रुपये रोख, तीन पत्त्यांच्या कॅट ,२० हजार किमतीचे चार मोबाईल पाचशे रुपयांचे इतर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
दरम्यान या कारवाईच्या ठिकाणी एरंडोल शहरातील काही पत्रकार सुद्धा हजर होते या पत्रकारांना बबलू चौधरी यांनी प्रत्यक्ष मुलाखात देऊन आम्ही पोलीस विभागाला एरंडोल पासून ते नाशिक पर्यंत सुमारे लाखो रुपये हप्ते देतो तसेच काही दिवसापूर्वी सुद्धा आम्ही हप्ता दिल्याचे त्यांनी सांगितले तरीही आमच्यावर त्यांनी कारवाई केली आम्ही जर हप्ते देतो तर त्यांनी का कारवाई केली याबाबत जोरदार शब्दात जाब विचारला आहे तसेच यावेळी पुढे बोलताना बबलू चौधरी यांनी आम्हाला जळगाव पोलीस विभागातर्फे परवानगी असल्याचे देखील सांगितले शहरात अनेक अवैद्य धंदे सुरू असून मात्र आमच्यावरच कारवाई का असा प्रश्न देखील सुद्धा त्यांनी उपस्थित केला. सदर छापेमारीत पोलिसांनी २० ते २२ लाख रुपये हस्तगत केल्याचे देखील सांगितले.