एरंडोलला अँग्लो उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रम.

IMG-20240910-WA0028.jpg


प्रतिनिधी एरंडोल – येथील अँग्लो उर्दु हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे शिक्षक दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजित करण्यात आले होते. यावेळी अंजुमन-ए-इस्लाम ट्रस्टचे अध्यक्ष आणि सभासदांच्या हस्ते अँग्लो उर्दु हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांचे सत्कार व कौतुक करण्यात आल.े तसेच अलफैज फाउंडेशन जळगांव यांचे वतीने घेण्यात आलेले राज्यस्तरीय मिशन युपीएस्सी परीक्षा 2023-24 मध्ये तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतिय आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र आणि बक्षीसे देण्यात आली
कार्यक्रमात अंजुमन-ए-इस्लाम ट्रस्टचे अध्यक्ष ज़हिरोद्दीन शेख कासम, उपाध्यक्ष सैय्यद जाक़ीर हुसैन साबीर अली, सचिव शेख शकीलोद्दीन जमीलोद्दीन, जॉ. सेक्रेटरी अकील शेख जहिरोद्दीन, कोषाध्यक्ष जनाब रहीम शेख शफी, सभासद एजाज अहमद हाजी जुगन साहब, शेख हुसेन शेख ईसा, खालिद अहेमद रजीयोद्दीन शेख, सैय्यद कमर अली शौकत अली, यासिन खान करीम खान, लतीफ शेख अब्दुल, साबिर शब्बीर मुजावर, शकील शेख नबी बागवान यांचेसह माजी मुख्याध्यापक शेख सलीम शेख मोहम्मद  उपस्थित होते. सूत्रसंचालन इरफान काझी सर यांनी केले. यशस्वीतेसाठी प्राचार्य शेख अमजद शेख जाफर, युसूफ सर, मुख्तार सर, इरफान सर, सैय्यद इमरान, अल्तमश सर, अज़हरोद्दीन सर, जुबेर सर,  मुदस्सर सर, माहेनाज मॅडम, नदीम सर, शोएब सर, वाजिद सर, फराज़ सर, एजाज़ शेख, युसूफ शेख, जावेद अहमद, अश्फाक बागवान  आदींनी परिश्रम घेतले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!