शिवसेनेच्या ( शिंदे गट ) दोन मोठ्या नेत्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र….!
प्रतिनिधी – एरंडोल येथील शिवसेना शिंदे गटाच्या दोन प्रमुख नेत्यांनी राजीनामा दिल्याने शिवसेनेच्या गटात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की , आ. चिमणराव पाटील चिमणराव पाटील यांचे कट्टर व खंदे समर्थक शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र दोधू चौधरी व शहर प्रमुख आनंदा रामदास चौधरी यांनी शिवसेना सचिव महाराष्ट्र राज्य संजय भाऊराव मोरे व शिवसेना जिल्हा प्रमुख वासुदेव पाटील यांच्याकडे आपल्या पदाचा वैयक्तिक कारण देत राजीनामा दिला . या राजीनाम्यामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठे खिंडार पडले असल्याचा चर्चा होत आहेत दरम्यान राजीनामा हा वैयक्तिक कारणामुळे दिला असला तरी यात नेमके कारण काय याबद्दल तालुक्यात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.
विधानसभा निवडणुका तोंडावर असल्याने सदर राजीनाम्याकडे नागरिकांकडून तर्क वितर्क लावले जात आहे तसेच सदर बडे नेते कोणत्या वाटेने जातील याबद्दल देखील चर्चा होत आहे. दरम्यान राजकीय विश्लेषकांच्या मते या बड्या नेत्यांच्या राजीनाम्यामुळे आ. चिमणराव पाटील यांचा मतांवर फरक नक्कीच पडणार असल्याचे देखील बोलले जात आहे.