राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक सरचिटणीस ईश्वर सोनार यांना विविध गणेश मंडळात मिळाला आरतीचा मान.
प्रतिनिधी – एरंडोल येथील सामाजिक कार्यकर्ते व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा युवक सरचिटणीस ( अजित पवार गट ) ईश्वर सोनार यांच्या हस्ते नागराज गणेश मंडळ , रेणुका नगर गणेश मंडळ , मधुकर नगर गणेश मंडळ , विखरण येथील जय सावता गणेश मंडळ , जय बजरंग गणेश मंडळ अशा अनेक मंडळात त्यांच्या हस्ते आरती करण्यात आली.
तसेच प्रत्येक मंडळात जनसंपर्क साधत लोकांच्या समस्या जाणून घेतल्या व समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले तसेच महिलांशी संवाद साधत लाडकी बहिण योजनेत येणाऱ्या समस्या बद्दल जाणून त्या समस्या सोडवण्याचे सुद्धा आश्वासन दिले.
यावेळी विशाल पाटील गणेश पाटील योगेश महाजन ज्ञानेश्वर पाटील समाधान पाटील दिनेश महाजन शेखर पाटील भुषण पाटील होनाजी बोरसे मोहित सोनार शुभम अहिरे रामकृष्ण चौधरी व मित्रमंडळी उपस्थित होते.