शाळेमध्ये कोणतेही अपघात होऊन जखम झाल्यास काय करावे याचे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह प्रशिक्षण…
टीडीआरएफ द्वारा जागतिक प्रथमोपचार दिवस साजरा
विशेष प्रतिनिधी – दरवर्षी सप्टेंबर महिन्याचा दुसरा शनिवार जागतिक स्तरावर प्रथमोपचार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.त्या अनुषंगाने दरवर्षी जागतिक प्रथमोपचार दिवस साजरा करते. त्यानिमित्त दि. १४ सप्टेंबर २०२४ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंजनविहीरे ता. भडगाव येथे टीडीआरएफ(टार्गेट डिझास्टर रीस्पोंस फोर्स) द्वारा टीडीआरएफ संचालक हरिश्चंद्र ब. राठोड यांच्या मार्गदर्शनात जळगाव जिल्ह्यात प्रथमच जागतिक प्रथमोपचार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना टीडीआरएफ जिल्हा समन्वयक जळगाव शुभम रणदिवे यांनी जागतिक प्रथमोपचार दिनाची माहिती देवून जीवनात प्रथमोपचाराचे ज्ञान किती आवश्यक आहे व प्रथमोपचाराचे ज्ञान असेल तर आपणा कोनाचाही जीव वाचवू शकतो. प्रथमोपचाराचे प्रशिक्षण हे अधिकृत प्रशिक्षकांकडून घेणे आवश्यक आहे याबद्दल माहिती दिली.सोबतच विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे बँडेज बांधून प्रात्यक्षिकासह समजावून सांगितले.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक पंकज बाविस्कर प्रमुख उपस्थित होते सोबतच सहा. शिक्षक प्रवीण सुतार,उज्वला चव्हाण, ललिता बोरसे तसेच आकाश पाटील, हरीश बोरसे व शाळेतील विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.