शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी च्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर
प्रतिनिधी – शास्त्री फाउंडेशन संचालित, शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी महाविद्यालयाच्या सचिव सौ. रूपा शास्त्री यांच्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. तत्पूर्वी सत्कारमूर्तींना शुभेच्छा देण्यासाठी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री, उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी तसेच जळगावच्या my FM 94.3 चे कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या हस्ते सौ. रूपा शास्त्री यांचा सत्कार करण्यात आला. प्रा. डॉ. विजय शास्त्री, प्रा. डॉ. पराग कुलकर्णी तसेच प्रा. मंगेश पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रक्तदान शिबिराचे उद्घाटन सत्कारमूर्ती सौ. रुपा शास्त्री तसेच प्राचार्य डॉ. विजय शास्त्री आणि उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात उत्साह पूर्ण सहभाग नोंदवला. ‘रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या युक्तीला महाविद्यालयातील विद्यार्थी पात्र ठरतील असे अध्यक्षीय भाषणामध्ये सौ. रूपा शास्त्री यांनी प्रतिपादन केले. रक्तदान शिबिरासाठी जळगाव येथील माधवराव गोळवलकर रक्तपेढीने सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. मंगेश पाटील यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. राहुल बोरसे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.