एरंडोलला गणपती विसर्जन उशिराने परंतू शांततेत संपन्न-मोठ्या, उंच मूर्तींचे आकर्षण
एरंडोल (प्रतिनिधी) – सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील शहरातील गणपती विसर्जन थोडा वेळ उशिराने परंतू शांततेत संपन्न झाले. यंदाचे विशेष म्हणजे मोठ्या आकर्षक, उंच, गणेशमुर्ती होय. मिरवणूकीत शहरातील गणपती विसर्जन मिरवणूक पाहण्याकरिता रात्री बारा वाजेपर्यंत महिला, पुरूषांची गर्दी होती. त्यानंतर मात्र गर्दी कमी झाल्याने गणपती मंडळांनी वाजंत्रीसह लवकरात लवकर विसर्जन मिरवणूक संपविली. पोलिस, प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला.
प्रांताधिकारी मनिष गायकवाड, नुतन तहसिलदार प्रदिप पाटील, मुख्याधिकारी किरण देशमुखांसह शांतता समिती सदस्य उपस्थित होते. नपा (जुनी) जवळ प्रत्येक गणपतीला आरती करून पुष्पहार अर्पण करणे (सालाबादाप्रमाणे) यावर्षी देखील (प्रमुख मान्यवरांचे हस्ते) संपन्न झाले. यासाठी कार्यालय अधिक्षक विनोद पाटील आणि स्टाफ (बबलू परदेशी आदी) यांनी विशेष परिश्रम घेतले. शांतता समिती सदस्य माजी नगराध्यक्ष देविदासभाऊ महाजन, निवृत्त तहसिलदार अरूण माळी, माजी सभापती शालिग्रामभाऊ गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार प्रा. शिवाजीराव अहिरराव, कमरअली सैय्यद, आल्हाद जोशी, कुंदन ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते मोहन चव्हाण, विशाल सोनार (मनसे), बापूजी पाटील आदी उपस्थित होते. तत्पूर्वी एरंडोल शहरातील खासगी गणपती, कॉलनींमधील गणपती पाचव्या, सातव्या, नवव्या आणि दहाव्या दिवशी सकाळी विसर्जित्त करण्यात आल्या. पो. नि. सतिष गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि शरद बागल आणि सहकार्र्यांनी पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता .