Images1405166010.jpg

विशेष प्रतिनिधी अहमदनगर : महाराष्ट्र शासनाने शैक्षणिक धोरणान्वये काढलेल्या परिपत्रकाची तातडीने अंमलबजावणी करावी, असे निवेदन सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार दीपक पाचपुते जिल्हाध्यक्ष ज्ञानमाता सेवाभावी संस्था व इतर सदस्य यांनी भास्कर पाटील यांच्याकडे ईमेल द्वारे दिले आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि विद्यार्थिनींच्या हितासाठी सरकारी आणि खासगी शाळेमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावेत, विद्यार्थी सुरक्षा आढावा समितीची अंमलबजावणी करण्यात यावी, सखी सावित्री समितीबाबतच्या तरतुदीचे अनुपालन करण्यात यावे, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत, बदलापूर आणि दौंड तालुक्यातील विद्यार्थिनींसोबत मळद येथे झालेल्या अन्यायाच्या अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून योग्य ती पावले उचलणे काळाची गरज आहे.



शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असलेली मुले सर्व जातीधर्माची आहेत. त्यानुसार सर्व जाती धर्मातील घटकांना न्याय देणे हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या समता आणि बंधुत्व या तत्त्वात आहे. त्यानुसार कुठल्याही विद्यार्थी, विद्यार्थिनींवर अन्याय, अत्याचार होऊ नये यासाठी योग्य ती पावली उचलणे काळाची गरज आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!