पीठ गिरणी चालक-मालक संघटनेतर्फे आ. चिमणराव पाटलांना विविध मागण्यांचे निवेदन
प्रतिनिधी एरंडोल – तालूक्यातील पीठ गिरणी चालक-मालक संघटनेत्तर्फे आ. चिमणराव आबा पाटील यांना विविध मागण्यांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची पीठ गिरणी चालक-मालक संघटनेची भेट घडवून आणण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनातील मागण्या पुढील प्रमाणे – संगठित पीठ, मसाला, पापड, भात गिरणींना शेती पूरक गृह उद्योगात घेऊन अत्यावश्यक सेवेत समाविष्ट करावे, पीठ, मसाला, पापड, भात गिरणींना शेती पूरकमध्ये समाविष्ट करून शेतकर्यां प्रमाणे विज कनेक्शन व सौर ऊर्जा मिळावी, बांधकाम कामगाराप्रमाणे संगठीत पीठ, मसाला, पापड, भात गिरणी कामगारांना शासनाच्या सवलती मिळाव्यात,
कोरोना काळात संसर्ग होऊन अनेक पीठ गिरणी मालक व कामगार आपल्या जिवाला मुकले आहेत त्यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत मिळावी, संगठीत पीठ, मसाला, पापड, भात गिरणी विज ग्राहकांच्या कामगारांच्या कुटुंबास विमा संरक्षण मिळावे, संगठीत पीठ, मसाला, पापड, भात गिरणी कामगारांसाठी आर्थिक महामंडळाची नियुक्ती करावी संगठीत कामगार म्हणुन औषोधपोचाराची व्यवस्था शासना मार्फत मोफत व्हावी, वय वर्षे 50 नंतर मानधन योजना राबवावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
याप्रसंगी गिरणी चालक-मालक संघटना अध्यक्ष सलिम पिंजारी, उपाध्यक्ष लक्ष्मीकांत पाटील, सचिव दयानंद मराठे, विष्णू महाजन, नामदेव महाजन, सचिन पवार, शेख युनूस, अनिल पाटील, नितीन पाटील, राजेंद्र कोळी, बापू मिस्तरी आदी उपस्थित होते.