आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन व्यापक साजरा व्हावा.
विशेष प्रतिनिधी अहमदनगर :- जिल्ह्यातील सर्व शासकीय आस्थापना यांना २८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करण्यासाठी *सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. दिपक पाचपुते* अहमदनगर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी व सर्व पोलीस स्टेशन शाखा प्रभारी अधिकारी अहमदनगर यांना 28 सप्टेंबर 2024 हा आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा करणे म्हणून आदेश प्राप्त झाले आहेत. सामाजिक कार्यकर्ते दिपक पाचपुते यांच्या मागणीच्या अनुषंगाने आदेश पारित झाला आहे ,
राकेश ओला पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी सदरचा आदेश पारित केला आहे असे समजते .
सर्वसामान्य जनतेला शासनाचे विविध योजना,अधिकार, सवलती हे पोहोचण्यास खूपच अनास्था ही कधी कधी शासन पातळीवर होते. यामुळे त्यामुळे सर्व सामान्य जनतेला नाहक त्रास सहन करावा लागतो.यासाठीच ज्ञानमाता सेवाभावी संस्था संचलित माहिती अधिकार नागरिक समूह महाराष्ट्र हे राज्यभर काम करीत आहेत. त्याच अनुषंगाने जिल्हाध्यक्ष मार्गदर्शक श्री. दिपक पाचपुते यांच्या मागणीला तातडीने पत्रव्यवहार करण्यात आला आहे. व जिल्हातील सर्व आस्थापना २८ सप्टेबर माहिती अधिकार दिन व्यापक पद्धतीने साजरा करण्याचे आदेश दिले आहेत.