इच्छुकांच्या भाऊ गर्दीमध्ये,पक्ष की अपक्ष,
जनतेचे लागले याकडे लक्ष.
एरंडोल प्रतिनिधी – एरंडोल हे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील एक तालुक्याचे छोटे शहर असून ते शहर अंजनी नदीच्या काठी वसलेले आहे. ते पूर्वी एक चक्र नगरी म्हणून ओळखले जात होते. कालांतराने ते अरुणावती आणि शेवटी एरंडोल म्हणून ओळखले जाऊ लागले.देशाच्या स्वातंत्र्या नंतर पहिल्या 1951 व 1952 साली झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत एरंडोल मतदार संघातून प्रथम आमदार म्हणून स्वातंत्र्य सेनानी सिताराम भाई बिर्ला हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते तसेच सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत त्यांनी आमदार होण्याच्या मान मिळवला होता.यासाठी त्यांनी तालुक्याला भरीव असं कार्य केले आहे त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे गिरणा धरणाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून देणे यासाठी त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा देखील त्याग केला होता.यानंतर 1962 ,1967,1972, अशा सलग तीन टर्म मध्ये दादासाहेब दिगंबर शंकर पाटील हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते.त्यांची ही निवड ऐतिहासिक ठरली होती. एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवार सलग तीन वेळेस निवडून येणे ही त्याकाळी खूप मोठी बाब समजली जात होती तसेच अशा पद्धतीने एरंडोल विधानसभा क्षेत्रात आजतागायत कोणताही उमेदवार अशा पद्धतीने सलग तीन वेळेस निवडून आलेला नाही. याचबरोबर 1978 साली झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत प्रथमच जनता पक्षाकडून महेंद्रसिंग धरमसिंग पाटील हे तरुण उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले व त्यांनी त्याकाळच्या इंदिरा काँग्रेस पक्षाच्या उमेदवार पारूताई चंद्रभान वाघ यांना पराजित करून प्रथमच एरंडोल तालुक्यातील सर्वात तरुण उमेदवार म्हणुन निवडून गेले.यानंतर 1980 व 1985 साली दोन टर्म मध्ये सत्ताधारी पक्षाच्या पारूताई चंद्रभान वाघ यांनी निवडून येत विधानसभेत प्रवेश केला.अशा पद्धतीने 1951 ते 1985 सालापर्यंत तब्बल 35 वर्ष एरंडोल तालुक्यातील उमेदवार हे आमदार म्हणून निवडून आले होते तर 1990 साली झालेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत प्रथमच पारूताई चंद्रभान वाघ यांच्यासमोर धरणगांव येथील शिवसेनेचे उमेदवार हरीभाऊ आत्माराम महाजन हे निवडून आले.यानंतर 1995 साली झालेल्या निवडणुकीत परत महेंद्रसिंग धरमसिंग पाटील हे जनता दलाकडून उभे राहिले तर प्रतिस्पर्धी उमेदवार रमेश जगन्नाथ महाजन शिवसेना यांना त्यांनी पराभूत केले अशा पद्धतीने महेंद्रसिंग धरमसिंग पाटील हे दुसऱ्यांदा विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले.यानंतर 1999 साली झालेल्या निवडणुकीत विद्यमान पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव रघुनाथ पाटील शिवसेना यांनी त्याकाळचे आमदार महेंद्रसिंग धरमसिंग पाटील यांचा पराभव केला व पहिल्यांदाच एरंडोल तालुक्यात शिवसेनेचे आमदार म्हणुन निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला.यानंतर पुढील 2004 साली सुद्धा गुलाबराव रघुनाथ पाटील यांनी निवडून येत दुसऱ्यांदा विधानसभेत आमदार होण्याचा मान मिळवला. यानंतर 2009 साली होऊ घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीच्या वेळी एरंडोल तालुक्यातून धरणगांव तालुका वेगळा झाल्याने एरंडोल तालुक्याला पारोळा तालुका व भडगाव येथील अमडदे गिरड गट जोडल्याने एरंडोल तालुक्यातील उमेदवारांना हवी तशी संधी न मिळाल्याने पारोळा तालुक्यातील राजकारण्यांना संधी मिळाली व शिवसेनेतर्फे चिमणराव रूपचंद पाटील तर राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे डॉ. सतीश भास्करराव पाटील यांच्यात लढत होऊन शिवसेनेचे चिमणराव रूपचंद पाटील हे निवडून आले. त्यानंतर 2014 साली पारंपरिक प्रतिस्पर्धी डॉ. सतीश भास्करराव पाटील राष्ट्रवादी व चिमणराव रूपचंद पाटील शिवसेना यांच्या परत लढत झाली यावेळी मात्र डॉ. सतीश भास्करराव पाटील निवडून आले व आमदार झाले. यानंतर 2019 साली परत पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांना मध्ये सामना रंगला व चिमणराव रूपचंद पाटील हे पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आले.यावेळेस 2024 साली होऊ घातलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार चिमणराव रूपचंद पाटील यांनी तब्येतीच्या कारणामुळे माघार घेत आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून यावेळी सुद्धा त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी डॉ.सतीश भास्करराव पाटील हे निवडणुकीच्या तयारीत आहेत अजून त्यांचे तिकीट पक्षाकडून निश्चित झाले नसल्याने सध्या या मतदारसंघात दोन अपक्ष उमेदवारांनी उमेदवारी दाखल केले आहे.यात भगवान आसाराम महाजन तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष अमित राजेंद्र पाटील यांनी बंडखोरी करत आपला अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे
आतापर्यंत एरंडोल विधान सभा मतदार संघात 1951 पासून ते 1972 पर्यंत काँग्रेस पक्षाने आपले उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आणले.त्यानंतर मात्र 1978 साल वगळता 1980 ते 1990 या दोन निवडणुकीत पुन्हा पारुताई चंद्रभान वाघ यांच्या रूपाने काँग्रेसला परत आपला उमेदवार निवडून आणता आला त्यानंतर मात्र 1990 साली प्रथम हरिभाऊ आत्माराम महाजन यांच्या रूपाने शिवसेनेचे आमदार निवडून आले होते तर 1978 व 1985 साली जनता पक्षाचे महेंद्रसिंग धरमसिंग पाटील हे दोन वेळेस निवडून आले तर यानंतर 1999 ते सलग 2009 पर्यंत गुलाबराव रघुनाथ पाटील हे दोन वेळेस व चिमणराव रूपचंद पाटील हे एक वेळेस निवडून आले. आहेत तर राष्ट्रवादी पक्षातर्फे डॉ. सतीश भास्करराव पाटील हे 2014 साली एक वेळेस निवडून आलेले आहेत.दरम्यान आत्ताची परिस्थिती लक्षात घेता काँग्रेस,भाजपा व मनसे हे राजकीय पक्ष वगळता राष्ट्रवादी व शिवसेना या दोघ पक्षांमध्ये फूट पडून या दोन पक्षांचे चार पक्ष उदयास आलेले आहेत तर सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शिवसेना उबाठा व मित्र पक्ष यांची महाविकास आघाडी असून भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित दादा गट व मित्रपक्ष यांची महायुती महाराष्ट्र उदयास आली असून या दोन्ही आघाडी व युतीमध्ये निवडणूक रंगत आहे यातूनच महाविकास आघाडीचे डॉ. सतीश भास्करराव पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारीसाठी इच्छुक असून महायुती तर्फे अमोल चिमणराव पाटील शिवसेना शिंदे गट यांची उमेदवारी निश्चित झाली आहे तर या महाविकास आघाडी व महायुतीत अनेक उमेदवार निवडणुकीसाठी उभे राहण्यास इच्छुक आहेत त्यातील महायुतीत अमोल चिमणराव पाटील शिंदे गट यांची उमेदवारी निश्चित झाल्यावर देखील राष्ट्रवादी अजित दादा गट पक्षाचे तालुकाध्यक्ष अमित राजेंद्र पाटील यांनी अपक्ष उमेदवारी करत बंड खोरी केली आहे तसेच त्यांच्या पाठोपाठ त्यांच्याच पक्षातील डॉ.संभाजीराव पाटील हे देखील बंडखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे बोलले जाते तर महाविकास आघाडी तर्फे डॉ. सतीश भास्करराव पाटील शरदचंद्र पवार गट यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी शिवसेना उबाठा गटातर्फे देखील बंडखोरी होण्याचे निश्चित मानले जात आहे यात प्रामुख्याने डॉ. हर्षल माने जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन हे इच्छुक असल्याचे बोलले जात असून त्यांनी देखील मतदारांच्या गाठीभेटी सुरू ठेवले आहेत व मतदार संघात उमेदवारी आम्हालाच मिळणार अशी शाश्वती दर्शवली आहे.दरम्यान येणाऱ्या काळात जरी महायुती व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार उभे राहिले तरी भविष्यात त्यांना आपल्याच पक्षातील बंडखोरांच्या सामना करावा लागणार आहे तसेच एरंडोल तालुक्यात अल्पावधीत ज्यांनी उद्योग क्षेत्रात आपला ठसा उमटविला आहे असे भगवान आसाराम महाजन अपक्ष उमेदवार यांचे देखील मोठे आव्हान या उमेदवारांसमोर असणार आहे
1951 ते 1999 पर्यंत धरणगाव व एरंडोल मिळून एकच तालुका म्हणून एरंडोल तालुका होता व या तालुक्यात 11 आमदार झाले त्यानंतर चार आमदार एरंडोल पारोळा भडगाव मतदार संघात झाले तरीसुद्धा एरंडोल तालुक्याच्या हवा तसा विकास झाला नाही तालुक्यातील सर्वात मोठा उद्योग साखर कारखाना वनकुटे येथे होता तो देखील अनेक वर्षांपासून बंद आहे त्यातील काम करणारे कामगार देशोधडीला लागले त्यांची स्थिती परिस्थिती आतापर्यंत कोणीही समजून घेतले नाही तसेच तालुक्यात आत्तापर्यंत कुठलाही मोठा उद्योग उभारला नाही तालुक्यात बेरोजगारांची संख्या लक्षणीय असून याकडे देखील कोणीही लक्ष दिले नाही एरंडोल पारोळा व भडगाव जिल्हा परिषद गट या तिघ मतदार संकेत सर्वात जास्त मतदार संख्या एरंडोल तालुक्याची असून सुद्धा या तालुक्याला हवा तसा न्याय अजूनही कोणीही मिळून दिलेला नाही यात तालुक्याला माजी आमदार महेंद्रसिंग धरमसिंग पाटील यांच्या कार्यकाळात झालेला अंजनी प्रकल्प वगळता कुठलाही मोठा सिंचनाचा प्रकल्प उभारला गेलेला नाही अशा पद्धतीने येणाऱ्या काळात जनता आता कोणाच्या बाजूने झुकते माप देणार हेच बघावे लागणार आहे.