एरंडोल मतदारसंघात पक्ष व अपक्ष उमेदवारांनी शक्ती प्रदर्शनासह भरले नामांकन पत्र….! चुरस निर्माण होईल याकडे सर्वांचे लक्ष.

InCollage_20241029_082902112.jpg


प्रतिनिधी – एरंडोल व पारोळा विधानसभा मतदारसंघातून २०२४ साठी आज दिनांक २८ सप्टेंबर रोजी एकाच दिवशी ५ उमेदवारांनी १० नामांकन पत्र शक्ती प्रदर्शनासह कार्यकर्त्यांच्या मोठ्या संख्येने शहरातून रॅली काढून दाखल केले. यावेळी पक्षासह अपक्षांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केल्याचे दिसून आले.
एरंडोल विधानसभा मतदार संघात आज महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री डॉ. सतीश भास्करराव पाटील यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्ती प्रदर्शन करून आपले नामांकन पत्र दाखल केले तसेच उबाठा गटाचे जिल्हा परिषद सदस्य तालुक्याचे भूमिपुत्र नाना पोपाट महाजन यांनी देखील आपले नामांकन दाखल केले. तर अजित पवार गटाचे समर्थक मानले जाणारे डॉ. संभाजी राजे पाटील यांनी देखील मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांसह आपले नामांकन पत्र दाखल केले. भाजपाचे माजी खासदार ए. टी.नाना पाटील यांनी  आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान प्रत्येक निवडणुकीत सारखे नाव असणारे सतीश भास्करराव पवार यांनी देखील आपले नामांकन पात्र दाखल केले.
विशेष हे की नाना पोपट महाजन यांनी आपले दोन उमेदवारी अर्ज दाखल करताना एक अपक्ष म्हणून तर दुसरा पक्षाच्या नावावर अर्ज दाखल केले आहे. तर अशोक तापीराम पाटील यांनी तीन अर्ज अपक्ष म्हणून दाखल केले आहे.दरम्यान मतदार संघात या निवडणुकीत बंडाळी उफाळून येण्याचे जास्त संकेत आहे.पत्रकारांशी बोलताना ए.टी.नाना पाटील यांनी मी अर्ज माघार घेणार नाही असे वक्तव्य केले असून डॉ .सतीश अण्णांनी देखील मी महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार आहे असे पत्रकारांना सांगितले.

About Author

You may have missed

error: Content is protected !!