हजारो नागरिकांच्या उपस्थितीत डॉ संभाजीराजे पाटील यांचा नामांकन अर्ज दाखल.

Images658824030.jpg

प्रतिनिधी – एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघात डॉ. संभाजीराजे पाटील यांनी अपक्ष म्हणून हजारोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी मतदारसंघात गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधत समाज उपयोगी काम करत नागरिकांशी संवाद साधला आहे.त्यांचा उमेदवारी अर्ज एरंडोल या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल केलेला आहे.यावेळी एरंडोल पारोळा व भडगाव विधानसभा मतदार संघातील असंख्य मतदार हजर होते.यात पुरुष व महिलांची संख्या लक्षणीय होती.दरम्यान डॉ संभाजीराजे पाटील यांच्या उमेदवारीमुळे  निवडणूक ही रंगतदार होणार आहे.
      नामांकन दाखल करण्यासाठी एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता. प्रारंभी शहरातून  जनता जनार्दनचा आशीर्वाद घेत एरंडोल  शहरातील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले,छत्रपती शिवाजी महाराज,वीर भगवान एकलव्य यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत डॉ संभाजी राजे पाटील यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
डॉ.संभाजीराजे पाटील उमेदवारी अर्ज भरल्यानंतर म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघाचा विकास झाला नसल्याने आपली उमेदवारी मतदारसंघाच्या विकासासाठी आहे. अपक्ष म्हणून आपण मतदारांकडे कौल मागणार असून निश्चित आपला या निवडणुकीत विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

      याप्रसंगी उमेदवार  यांचा उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांच्याकडे दाखल करण्यात आला.

About Author

You may have missed

error: Content is protected !!