रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षांच्या बैठकीत महत्त्वपुर्ण निर्णय.
प्रतिनिधी एरंडोल तालुक्यातील तळई ,उत्राण गटांत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले तालुका एरंडोल पक्षाची महत्वपूर्ण बैठक जळगाव जिल्हाध्यक्ष आनंद खरात साहेब यांच्या आदेशाने घेण्यात आली.
सदर बैठकीत एरंडोल, पारोळा, भडगाव विधानसभा मतदारसंघ महायुती मध्ये रिपब्लिकन पक्ष मित्र असलेल्या महायुती चे लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी भेट घेऊन मतदार संघातील समस्या वर चर्चा लेखी पत्र देऊन रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना गेल्या पाच वर्ष कोणत्याही प्रकारे विश्वासात घेतलेले नाही.त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी चा सुर एकमताने उमटलेला आहे. व होणाऱ्या एरंडोल ,पारोळा, भडगाव विधानसभा मध्ये महायुतीचे उमेदवार यांना कोणत्याही प्रकारची मदत न करण्याचे एकमताने ठरविण्यात आलेले आहे.
महायुती चे उमेदवाराचे निवडणूक प्रचार, सभा रॅली मध्ये वरिष्ठांचे आदेश येईपर्यंत रिपब्लिकन पक्ष एरंडोल तालुक्यात निवडणूक कामी सहभागी होणार नाहीत. प्रचार सभा व बैठका घेणार नाहीत. असे बैठकीत तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कळविण्यात आलेले आहे.असे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल भाऊ खोकरे यांनी जाहीर केले असून त्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी एकमताने ठराव केला आहे. एरंडोल तालुका अध्यक्ष प्रवीण भाऊ बाविस्कर तसेच तालुका सचिव देवानंद भाऊ बेहेरे यांनी आपली नाराजी व्यक्त करून महायुतीचे उमेदवाराचे निवडणूक प्रचारावर तटस्थ राहण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच भडगाव तालुक्यातील गिरड आमडदे गटांत रिपब्लिकन पक्षाचे भडगाव तालुकाध्यक्ष आदरणीय अण्णा साहेब खेडकर यांनी बैठक घेऊन महायुती विषयी नाराजी व्यक्त केली आहे.यावेळी बैठकीत उपस्थित संघटक देविदास जाधव, एरंडोल तालुका सरचिटणीस जैनुल शेख पत्रकार, उपाध्यक्ष बंडु पाटील, कासोदा शहर अध्यक्ष जितेंद्र वाघ, भाऊसाहेब पानपाटील, एरंडोल तालुका महिला आघाडी अध्यक्षा सौ.मायाताई खैरनार, सुभाष जाधव, किरण पानपाटील, आनंद सूर्यवंशी, आबा पाटील, राहुल बाविस्कर, महीला आघाडी तालुका सचिव सुनिता भोई, लताताई कोळी, उषाताई पाटील, माधुरी ताई पाटील, अरूणाताई कोळी, संगिता सोनवणे, सोनाली कोळी, ज्योतीताई पांडे, सुनंदा ताई भोई, तालुका सचिव महीला आघाडी , सुरेखा ताई घोडेस्वार,रशिद मिस्तरी, बशीर शेख, जुबेर शेख,जैद शेख,साद शेख,राजू अहिरे, रुपालीताई पाटील,छाया भोई, संगिता खैरनार,राम लोहरे, पिंटू वंडर, संतोष सोनवणे,भाऊलाल सोनवणे, दिपक जाधव मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.