गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेच्या ४ मल्लांची राज्य स्तरावर निवड.

InCollage_20241102_104227685.jpg


प्रतिनिधी – एरंडोल येथील गुरु हनुमान कुस्तीगीर संस्था व जळगाव जिल्हा स्तरीय कुस्ती चाचणी समन यांच्या ४ मल्लांची राज्य स्तरावर निवड झाली आहे.त्यांनी विभागीय स्तरावर यश संपादन केल्याने त्यांची निवड करण्यात आली आहे.
      दरम्यान यात ४४ कि.वजनी गटात ग्रिको रोमन राम राजेंद्र पाटील,४८ कि.वजनी गटात ग्रिको रोमन पियूष अनिल मराठे,४६ कि.वजनी गटात फ्रिस्टाईल यामिनी भानुदास आरखे,५९ कि.वजनी गटात फ्रिस्टाईल प्रेरणा अनिल मराठे यांची निवड करण्यात आली आहे.सदर स्पर्धा ६ ते ८ नोव्हेंबर रोजी नेवासा फाटा,ता.नेवासा, जि.अहिल्या नगर व ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान लोणी देवकर, ता.इंदापूर, जि.पुणे, भगुर ता. जि.नाशिक येथे १५ वर्षाखालील ग्रिकोरोमन राज्य अजिंक्य स्पर्धेसाठी निवड झाली आहे.सदर खेळाडू हे जिजामाता विद्यालय व दा. डी. शं.पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत.या विद्यार्थ्यांना भानुदास आरखे,अनिल मराठे,राष्ट्रीय खेळाडू योगेश्वरी मराठे,दिलीप सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.यशस्वी खेळाडूंचे अनु.जाती जमाती मोर्चा भाजपा प्रदेश समन्वयक ऍड.किशोर काळकर,बालाजी उद्योग समूहाचे संजय काबरा,कार्यकारिणी सदस्य म.रा.कुस्तीगीर संघ पुणे सुनील देशमुख,युवासेना जिल्हा प्रमुख प्रा.मनोज पाटील,शिवसेना शहर प्रमुख बबलू चौधरी,सामाजिक कार्यकर्ते आनंद दाभाडे, गुरु हनुमान कुस्तीगीर संस्थेचे उपाध्यक्ष पंकज पाटील,खजिनदार ऋषिकेश महाजन,कार्याध्यक्ष दुर्गादास वानखेडे,अनिल आरखे,अनिल भोई,दिलीप पाटील,संजय कुंभार,जावेद खाटीक,संभाजी देसले,अनिल पाटील,राजू साळी,नगराज पवार,नरेंद्र निकम,पिंटू पाटील,स्वप्नील बोरसे तसेच सर्व संचालक मंडळ व बंधू भगिनींनी अभिनंदन केले आहे.

About Author

You may have missed

error: Content is protected !!