एरंडोल येथे बळीराजा दिनानिमित्त बळीराजा उत्सव संपन्न.
प्रतिनिधी – एरंडोल येथे सत्यशोधक समाज संघाच्या वतीने बळीराजा दिनानिमित्त बळीराजाच्या प्रतिमेची बैलगाडीतून शोभायात्रा काढून बळीराजा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
बलिप्रतिपदा म्हणजे बळीराजाचे स्मरण करण्याचा सण भारतीय संस्कृतीत बळीराजा न्यायी,दानशूर,सद्गुणी म्हणून विख्यात आहे.बळीचे राज्य अर्थात समतेचे ,न्यायचे राज्य.त्यांच्या राज्यात स्त्री – पुरुष विषमता,जातीभेद,वर्णभेद रहित राज्य अशा महादान शुर बळीराजाची आठवण दिवाळीला बलिप्रतिपदेला बळीराजाचे वारस शेतकरी व आया बहिणी इडपिडा जावो,बळीचे राज्य येवो असे म्हणून व दरवर्षी बळीराजा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करतात.यानिमित्त एरंडोल येथे बैलगाडीतून भव्य शोभायात्रा महात्मा ज्योतिबा फुले पुतळा,छत्रपती शिवाजी महाराज पुतळा,मारवाडी गल्ली,अमळनेर दरवाजा,नागोबा मढी मार्गे काढून परत महात्मा ज्योतिबा फुले पुतळा येथे समारोप करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत समजभूषण देविदास महाजन, रमेश महाजन,विजय महाजन,दशरथ महाजन,सत्यशोधक समाज संघ एरंडोल कार्यकर्ते विधिकर्ते शिवदास महाजन विधिकर्ता,हिलाल महाजन ता अध्यक्ष,कविराज पाटील सचिव,खुशाल महाजन,अनिल महाजन, हिम्मत महाजन, प्रल्हाद महाजन,मनोज महाजन, हेमंत महाजन, कमलेश महाजन,समाधान महाजन,विश्वनाथ महाजन,दीपक महाजन, दिनेश महाजन,रघुनाथ महाजन,राजेंद्र महाजन मोहन, सचिन महाजन तसेच ओबीसी,दलित,आदिवासी,भटके,पत्रकार अल्पसंख्यांक बंधू उपस्थित होते.