भारतीय मजदूर संघ जळगाव जिल्हा पदाधिकारी यांची व्यापक बैठक ……! दिवाळी निमित्त स्नेह भेट व संवाद चर्चा संपन्न !
विशेष प्रतिनिधी – भारतीय मजदूर संघ जळगाव जिल्ह्यातील पदाधिकारी यांची व्यापक बैठक व दिवाळी निमित्त स्नेह भेट व संवाद चर्चा यासाठी आज दि. ०६-११-२०२४ बुधवार रोजी जिल्हा कार्यालय येथे आयोजित करण्यात आली. सदर स्नेह भेट व संवाद चर्चा या कार्यक्रमासाठी भा. म. संघाचे प्रदेश महामंत्री किरणजी मिलागिर, प्रदेश सचिव प्रविणजी अमृतकर, वि.गो. पेंढारकरजी, प्रदेश सचिव मा. सौ. वंदनाजी कोलारकर, जिल्हा अध्यक्ष अभय विसपुते, जिल्हा सचिव सचिन लाड वंजारी यांच्या नेतृत्वाखाली घेण्यात आली.
भा म संघाचे महामंत्री कीरणजी मीलगिर हे चार दीवसांच्या जिल्हा दौऱ्यावर आहेत. धुळे,शहादा,गडगाव, जळगाव आणि छत्रपती संभाजी नगर येथे भेट देणार आहेत.त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना १ डिसेंबर ते १५ डिसेंबर पर्यंत संपर्क अभियान राबविण्याचे आवाहन केले.त्यात पंच परिवर्तन ,सामाजिक समरसता ,कुटुंब प्रबोधन ,मतदान जनजागृती अभियान असे असे कार्यक्रम राबवण्याचे सांगितले आहे.
या या बैठकीला जळगाव जिल्हा मजदूर संघ जळगाव जिल्हा म्युनिसिपल लेबर युनियन, हॉस्पिटल एम्प्लॉईज युनियन, जळगाव, रावेर तालुका कामगार युनियन, ग्रामपंचायत कर्मचारी संघ, डोमेस्टिक वर्कर्स युनियन, वीर सावरकर रिक्षा युनियन, माँ जिजाऊ ॲपे रिक्षाचालक मालक संघ, भारतीय मच्छिमार संघ, काॅ-ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियन, जळगाव-धुळे जिल्हा महाराष्ट्र मोटार कामगार युनियन, जळगाव , जळगाव पीपल्स बँक एम्प्लॉईज युनियन, इंडियन सिक्युरिटी गार्ड असोसिएशन, पटेल जर्दा श्रमिक संघ, सूर्यछाप जर्दा श्रमिक संघ, वीर सावरकर टॅक्सी युनियन, बांधकाम कामगार संघ व असंख्य पदाधिकारी उपस्थित होते.