एरंडोल तालुक्यात अमोल पाटील यांचा तडाखेबाज प्रचार

IMG-20241108-WA0069

गावागावात लाडक्या बहिणींनी केले औक्षण, वचनाला खरा उतरणारा नेता

प्रतिनिधी – शिवसेना महायुतीचे एरंडोल-पारोळा विधानसभा मतदारसंघातील अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांच्या प्रचाराचा धडाका जोरात सुरू आहे. एरंडोल तालुक्यात अनेक गावात मतदारांनी त्यांचे जंगी स्वागत केले. फुलांची उधळण करीत गावोगावी महिला भगिनींनी अमोल पाटील यांचे औक्षण केले.

एरंडोल तालुक्यातील भालगाव, धारागीर, पळासदळ, नांदगाव, टोळी, उमर्दे, वरखेडी, विखरण, चोरटक्की, रिंगणगाव, पिंपळकोठा प्र. चा., सावदे प्र.चा., या परिसरात शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार अमोल चिमणराव पाटील यांचा संपन्न झाला. यावेळी काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत अबाल-वृद्ध, महिलांचा उत्स्फूर्तपणे सहभाग दिसून आला.

मागील कार्यकाळात या भागातील जनतेला दिलेल्या वचनांची पूर्तता करून विकासकामे हाती घेतल्याने आम्हाला समाधान असल्याचे शेतकरी व ग्रामस्थांनी अमोल पाटील यांना सांगितले. तसेच तुम्ही वचनाला खरे उतरलेले नेते असून तुम्ही दिलेला शब्द पाळला आहे. “आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत आहोत” अशी भावना मतदारांना व्यक्त केली.

प्रत्येक गावात काढलेल्या भव्य रॅलीत अनेक लाडक्या बहिणींनी अमोल पाटील यांची आरती व औक्षण करून स्वागत केले.
यावेळी वासुदेव पाटील शिवसेना जिल्हाप्रमुख, बबलू पाटील युवासेना माजी तालुका प्रमुख, रवी जाधव शिवसेना तालुकाप्रमुख, गौरव पाटील, कुणाल महाजन लाडकी बहीण योजना तालुकाप्रमुख, सुदाम राक्षे विधानसभा क्षेत्र प्रमुख, कमलेश पाटील तालुकाप्रमुख युवा सेना, ज्ञानेश्वर कंखरे भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, ज्ञानेश्वर आमले जि. प. माजी उपाध्यक्ष, किरण पाटील मार्केट कमिटी डायरेक्टर, बाळासाहेब पाटील टोळी सरपंच, गौरव पाटील अंतुर्ली सरपंच, बापू पाटील माजी पंचायत समिती सभापती, नाना पाटील धारागीर सरपंच, मोहन भाऊ सोनवणे, रामभाऊ मराठे, छोटू मराठे यांच्यासह व परिसरातील महायुतीचे सरपंच, पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

You may have missed

error: Content is protected !!