मतदार संघातील जनतेचे भक्कम समर्थन हेच माझे खरे बळ :-डॉ.संभाजीराजे पाटील
प्रतिनिधी -: एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार डॉ.संभाजीराजे पाटील यांनी आरोग्य नायक जीवन जनतेच्या सेवेसाठी अर्पण केलेले असून.लोकांच्या कल्याणाचे भावना असल्याची प्रतिक्रिया रोजच्या प्रचार रॅलीमध्ये मध्ये दिसत आहे भोंडण,चोरवड, पोपटनगर,खोलसर,कामतवाडी, या भागात आज सकाळपासून प्रत्येक घरोघरी प्रचार दौरा केला असून मिळत असलेला जनतेचा प्रचंड प्रतिसाद,आशिर्वाद भक्कम सामर्थ्याने हेच माझे खरे बळ असल्याचे प्रतिपादन डॉ. संभाजीराजे पाटील यांनी जनतेशी संवाद साधताना केले.
भव्य रॅली नंतर गावातील चौका चौकामध्ये.डॉ.संभाजीराजे पाटील यांनी गावकर्यांशी संवाद साधला. गावागावातील समस्या संदर्भात सविस्तर चर्चा केल्या.व मतदार संघाचा विकास हेच माझे ध्येय गाठत मी माझी उमेदवारी केली असून जनतेसमोर भावना मांडल्या.प्रत्येक गावामध्ये चांगला प्रतिसाद मिळत असल्याने अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे अशी चर्चा मतदार संघात सुरू झाली आहे