अपक्ष उमेदवार डॉ संभाजीराजे पाटील यांचा “वचननामा” जाहीर.
प्रतिनिधी एरंडोल पारोळा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार डॉ संभाजीराजे पाटील यांनी आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यात प्रामुख्याने MIDC , पाणी, रस्ते, शिक्षण, रोजगार यावर भर देण्यात आला आहे.
डॉ संभाजीराजे पाटील हे गेल्या २२ वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असून आज पर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो नागरिकांना लाभ मिळवून देत विक्रमी मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू मुक्त मतदारसंघ करण्याचा त्यांचा मानस आहे.
आपल्या फाउंडेशनमार्फत आजपर्यंत विविध क्षेत्रात शेतकरी, विद्यार्थी, महिलासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवून त्यांनी आपल्या सामाजिक कार्याची घोडदौड सुरु ठेऊन आज विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघासाठीचे त्यांची व्हिजन म्हणजेच वचननामा आज जाहीर केला आहे.
माझा वचननामा हा अभ्यासपूर्ण असून, मतदारसंघातील आजच्या अवस्थेला प्रगतीच्या मार्गाने घेऊन जाऊन सर्वागीण विकासाचा मार्ग असल्याचे डॉ संभाजीराजे यांनी सांगितले. जनतेने दिलेला मतदानरूपी आशीर्वादाची फेड हि वचननामा तील सर्व वचन पूर्ण करूनच होईल असा विश्वास देखील डॉ संभाजीराजे यांनी व्यक्त केला.