शास्त्री फार्मसी महाविद्यालयात प्रथम पदवी प्रदान समारंभ संपन्न
प्रतिनिधी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोनेरे,अंतर्गत शास्त्री फार्मसी महाविद्यालय,एरंडोल येथे दि. 16.नोव्हे. 2024 रोजी सन 2022-23 मध्ये औषध निर्माण शास्त्र पदवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता सरस्वती यांच्या पूजनाने झाली. प्रसंगी व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विजय शास्त्री, सचिव रूपा शास्त्री तसेच उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी उपस्थित होते.
बदलत्या शिक्षण प्रवाह सोबत जाण्याची तयारी विद्यार्थ्यांनी ठेवावी, नवनवीन तंत्रज्ञानाचा ध्यास ठेवावा, पारंपारिक शिक्षणाला कौशल्यपूर्ण शिक्षणाचा आधार घ्यावा असं प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय शास्त्री यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात केले. सदरील कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देखील भरभरून प्रतिसाद दिला. काही विद्यार्थ्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद झळकून दिसत होता कारण त्यांना पुन्हा एकदा महाविद्यालयात येण्याचा योग लाभला होता. आलेल्या विद्यार्थ्यांपैकी बरेचसे विद्यार्थी हे आज मोठमोठ्या नामांकित कंपनीमध्ये चांगल्या पदावर काम करत असून हे फक्त शास्त्री फार्मसी महाविद्यालय आणि तेथील शिक्षक यांच्या घेण्यात येणाऱ्या अथक परिश्रमामुळे शक्य झाले असे एका विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले.
औषध निर्माण शास्त्र पदवी झाल्यानंतर भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये संधी असतात या विषयावर उपप्राचार्य डॉ. पराग कुलकर्णी यांनी प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अल्पपहारचे आयोजन देखील करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रद्धा शिवदे तर आभार प्रदर्शन प्रा. जावेद शेख यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन प्रा. राहुल बोरसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील सर्वच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.