महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा अपक्ष उमेदवार डॉ. संभाजी राजे पाटील यांना बिनशर्त पाठिंबा….
प्रतिनिधी – एरंडोल पारोळा भडगाव विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या पारोळा एरंडोल मतदारसंघात मोठी खळबळ उडाली आहे पारोळा एरंडोल मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना जळगाव जिल्हा उपाध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पाठिंबा देण्यात आला आहे . गेल्या अनेक दिवसांपासून अपक्ष उमेदवार डॉ. संभाजीराजे पाटील यांना एरंडोल पारोळा मतदारसंघातून जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून त्यांनी एरंडोल पारोळा मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी जाहीर केलेल्या जाहीरनाम्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश आहे. त्यामुळे मतदारसंघातील तसेच राज्यातील अनेक संघटना ह्या डॉ. संभाजी राजे पाटील यांना जाहीर पाठिंबा देताना दिसत आहे
आतापर्यंत डॉ. संभाजी राजे पाटील यांना अनेक संघटनांचा पाठिंबा…
डॉ. संभाजीराजे पाटील हे उच्चशिक्षित आणि गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व असल्याने त्यांच्याकडे जनता ही अपेक्षांनी पाहत आहे. जळगाव जिल्हा हा सुजलाम सुफलाम व्हावा यासाठी नारपार सारख्या महत्त्वकांक्षी प्रकल्पाची त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण माहिती घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून या प्रकल्पावर त्यांचे काम सुरू आहे.
एरंडोल पारोळा मतदार संघातील बंद पडलेला साखर कारखाना, तरुणांना रोजगार शिक्षण आणि मतदारसंघाच्या सर्वांगीण विकास असा संपूर्ण विषयांना हात घालणारा जाहीरनामा त्यांनी तयार केला आहे. या जाहीरनामामुळे मोठ्या प्रमाणावर राज्यातील संघटना यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शबरी माता सेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यासह जिल्ह्यातील अनेक संघटनांनी डॉ.संभाजीराजे पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला असल्याचे संभाजीराजे पाटील यांनी पत्रकार परिषद सांगितले.