मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत
अमळनेर भाजपा कार्यकर्त्यांचा श्री मंगळग्रह मंदिरात अभिषेक
अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत म्हणून अभिषेक केला.
नुकताच महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला असून महाराष्ट्रात महायुतीला बहुमत मिळाले आहे. मुख्यमंत्रीपदी नेमके कोण विराजमान होणार याबाबत उत्सुकता असतानाच अमळनेर येथील भाजपा कार्यकर्त्यांनी ख्यातनाम श्री मंगळ ग्रह मंदिरात येऊन मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान व्हावेत म्हणून भाजपाचे शहराध्यक्ष विजय राजपूत, सरचिटणीस दिलीप ठाकूर, गोकुळ परदेशी, उपाध्यक्ष सुभाष पाटील, गणेश बडगुजर, शिवदास महाजन, रमेश देव, शेखर कुलकर्णी, विजय वानखेडे, गोकुळ पाटील, महावीर मोरे, महेश संदानशिव, विजय बारी, रवी ठाकूर, मुन्ना कोळी, योगीराज चव्हाण, युवा मोर्चा सरचिटणीस समाधान नाना पाटील, शिवकिरण बोरसे, बाळू जाधव, देवा भाई, गौरव सोनार, हर्षल शिंपी, दीपक बोरसे, राम भैया कलोसे यांनी अभिषेक केला.