श्री मंगळग्रह मंदिरात भक्तिमय वातावरणात श्री कालभैरव याग
अमळनेर : येथील ख्यातनाम श्री मंगळग्रह मंदिरात श्री कालभैरवजी व माता भैरवी देवी यांच्या मूर्तींची यावर्षीच प्राणप्रतिष्ठा झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर मंदिरात श्री कालभैरव जयंतीनिमित्त २३ रोजी श्री कालभैरव याग अतिशय भक्तिमय व चैतन्यमय वातावरणात संपन्न झाला.
यागाचे मानकरी डॉ. उदय अहिरराव, जीवन पाटील, चंद्रकांत भानुदास भदाणे, सुरज सराफ, हितेशभाऊ तांबट, हरी ओम हिरानंद पंजाबी, डॉ. ज्ञानेश पाटील, प्रा. हेमंत पाटील आणि डॉ. जितेंद्र पाटील हे होते.
सुरवातीला या नऊ सपत्नीक यजमानांच्या हस्ते संकल्प, गणपती पूजन, पुण्याहवाचन, स्थापीत देवता आवाहन पूजन, श्री कालभैरव-श्री भैरवी माता पूजन, हवन झाले. त्यानंतर पूर्णाहुती होऊन महाआरतीने यागाची सांगता झाली. यावेळी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आला.
मंदिराचे पुरोहित केशव पुराणिक, सुनील मांडे, सारंग पाठक, अबरीश कडवे, अथर्व कुलकर्णी, जयेंद्र वैद्य, तुषार दीक्षित, गणेश जोशी, मंदार कुलकर्णी, अभिषेक भट, अक्षय जोशी, उमेश पाठक यांनी पौरोहित्य केले.
पखवाज वादक म्हणून अंकुश जोशी होते.
याप्रसंगी मंगळग्रह सेवा संस्थेचे उपाध्यक्ष एस. एन. पाटील, सचिव एस. बी. बाविस्कर, खजीनदार गिरीश कुलकर्णी, विश्वस्त अनिल अहिरराव, जयश्री साबे, मंगल सेवेकरी प्रकाश मेखा, सुनील गोसावी, आशिष चौधरी, बाळा पवार, जनसंपर्क अधिकारी शरद कुलकर्णी, कार्यालय अधीक्षक भरत पाटील यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
नवनिर्वाचीत आमदार अनिल पाटील यांनीही घेतले दर्शन
नवनिर्वाचित आमदार अनिल पाटील त्यांचे अपार श्रद्धास्थान असलेल्या श्री मंगळग्रह मंदिरात सकाळपासूनच थांबून होते. विजय निश्चित होताच त्यांनी मंगळदेवाचे दर्शन घेतले . देवाला माल्यार्पण करुन मंदिर विश्वस्थांकडून पहिला सत्कार स्वीकारला . त्याचवेळी मंदिरात श्री कालभैरव महायाग सुरु होता. पाटील यांनी त्या स्थळी जाऊन दर्शन व पुरोहितांकडून आशीर्वाद घेतले .